पुसद येथे जन्मकल्याणक महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:45+5:302021-04-29T04:32:45+5:30

यानिमित्त शुद्ध तुपाचा १००८ दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प सुनील सत्येंद्र गोरे यांनी केला होता. त्यांच्या धर्मपत्नी नीता गोरे व ...

Birth Welfare Festival celebrated at Pusad | पुसद येथे जन्मकल्याणक महोत्सव साजरा

पुसद येथे जन्मकल्याणक महोत्सव साजरा

googlenewsNext

यानिमित्त शुद्ध तुपाचा १००८ दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प सुनील सत्येंद्र गोरे यांनी केला होता. त्यांच्या धर्मपत्नी नीता गोरे व सहकारी निधी निशांत आहाळे यांनी श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष संदीप सत्येंद्र आहाळे यांच्या परवानगीने समाजातील लोकांच्या घरोघरी जाऊन, गाव-परगावातून या सोहळ्यास देणगी गोळा केली. दीपोत्सवाकरिता राजेंद्र जैन यांची ऑनलाईन उपस्थिती लाभली. त्यांचे दीपनृत्य समाज बांधवांना पाहावयास मिळाले.

कार्यक्रमाला येथील डीवायएसपी अनुराग जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी प्रथम दीप प्रज्वलित केला. त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. हे सांस्कृतिक पर्व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु करण्यात आले होते.

यात भक्तीगीत, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, भक्तीनृत्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा, धार्मिक शिबिर, त्याचबरोबर गृह सजावट व रथ सजावट अशा स्पर्धा घेण्यात आल्या.

दीपोत्सवाची रचना गजेंद्र दिगंबर बोंद्रे व तेजश्री शैलेश आहाळे यांनी केली. ऑनलाईन मीटिंगचे आयोजन अंशुल राजेश वाळले, गौरव प्रदीप नरसिंग, प्रियंका अक्षय रवणे यांनी केले. सर्व समाज बांधवांनी नयनरम्य १००८ दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Birth Welfare Festival celebrated at Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.