बिरसा मुंडांच्या प्रतिमेवर भाजपाने लावले बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:33 PM2018-08-16T22:33:15+5:302018-08-16T22:34:12+5:30

येथील आदिवासी समाज मंदिरासमोर १५ आॅगस्टनिमित्त भाजपाच्यावतीने ध्वजारोहण करून महागौरव पर्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाच्यावतीने समाजमंदिराच्या भिंतीवरील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाचे बॅनर लावण्यात आले.

BJP has banned the image of Birsa Munda | बिरसा मुंडांच्या प्रतिमेवर भाजपाने लावले बॅनर

बिरसा मुंडांच्या प्रतिमेवर भाजपाने लावले बॅनर

Next
ठळक मुद्देपाटणबोरीत तणाव : आदिवासी बांधवांचा मोर्चा, कारवाईसाठी पोलिसांची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : येथील आदिवासी समाज मंदिरासमोर १५ आॅगस्टनिमित्त भाजपाच्यावतीने ध्वजारोहण करून महागौरव पर्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाच्यावतीने समाजमंदिराच्या भिंतीवरील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाचे बॅनर लावण्यात आले. परिणामी आदिवासी बांधव संतप्त झाले असून या विरोधात गुरूवारी मोर्चा काढून कारवाईची मागणी करण्यात आली.
गुरूवारी बॅनरवर लावलेल्या ठिकाणी आदिवासी समाजबांधवांनी एकत्र येऊन भाजपाच्या कृत्याचा निषेध केला. सायंकाळी दुचाकी रॅली काढून दोषींविरोधात घोषणा देण्यात आल्या. गुरूवारी सकाळी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मोतीष सिडाम यांच्या नेतृत्वात पांढरकवडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्यात आली. तसेच गावातून मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
त्यानंतर झालेल्या सभेला शेखर सिडाम, संभा मडावी, रितेश परचाके, किशोर कनाके, मोतीष सिडाम आदींनी मार्गदर्शन केले. मोर्चात दया सिडाम, मधू सिडाम, शालिक कनाके, अक्षय सिडाम, गजानन चांदेकर, अमोल कनाके, साई मेश्राम, सुनील आडे, विनोद कनाके, अतुल कनाके, गंगाराम सिडाम, आकाश कनाके, आकाश कुडमेथे, अनिकेत नैताम, अमोल सोयाम, माधव कनाके व समाजबांधव उपस्थित होते. संचालन चंद्रशेखर सिडाम यांनी केले.

मला बिरसा मुंडा यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. झेंडावंदनाच्या कार्यक्रमात आदिवासी समाजाचे नेते व नागरिक होते. तेव्हा ही बाब कुणाच्याच लक्षात आली नाही. नकळत झालेल्या प्रकाराबद्दल भावना दुखावल्या असून मी सर्वांची जाहिर माफी मागतो. आपण आदिवासी समाजाच्या सर्वच कार्यक्रमात सहभाग घेतो. मला समाजाबद्दलही आदर व प्रेम आहे.
- गजानन शिंगेवार
भाजपा शाखाध्यक्ष, पाटणबोरी

Web Title: BJP has banned the image of Birsa Munda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा