भाजपाच्या एकजुटीने झाली राष्ट्रवादीची कोंडी

By admin | Published: July 12, 2014 01:48 AM2014-07-12T01:48:20+5:302014-07-12T01:48:20+5:30

शहरात राष्ट्रवादीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत नगपरिषदेतील सत्तेत भागीदारी मिळविली. आता सहा सदस्यांच्या भरवशावर ...

BJP unanimously elected NCP holders | भाजपाच्या एकजुटीने झाली राष्ट्रवादीची कोंडी

भाजपाच्या एकजुटीने झाली राष्ट्रवादीची कोंडी

Next

यवतमाळ : शहरात राष्ट्रवादीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत नगपरिषदेतील सत्तेत भागीदारी मिळविली. आता सहा सदस्यांच्या भरवशावर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदारी केली जात आहे. मात्र भाजप नगरसेवकांनी जुळवून घेण्याचा पवित्रा घेतल्याने राजकीय समिकरणालाच कलाटणी मिळाली आहे.
राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या व्यक्तीगत प्रभावाचा उपयोग संख्याबळ जुळविण्यासाठी होईल हा त्यामागे छूपा उद्देश आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया नेत्यांच्याच पातळीवर झाली. प्रत्यक्ष नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले नाही. त्यामुळेच भाजप नगरसेवकांच्या बैैठकीत नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा असा एकमुखी सुर उमटला. बंडखोर सदस्यांनीच एकत्र येण्याचा मनसुबा व्यक्त केल्याने कालपर्यंत दुफळीमुळे दुबळी वाटणारी भाजप अचानक भक्कम झाली आहे.
सहा सदस्यांच्या बळावर राष्ट्रवादीने निर्णय प्रक्रियाच आपल्या हाती केंद्रित केली होती. यासाठी भाजप नगरसेवकांत असलेली फुट राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. आता राजकीय समीकरण बदलले असून केलेल्या चुकांची जाणीव भाजप नगरसेवकांना झाली आहे. भाजप नगरसेवकांच्या या भुमिकेमुळे राष्ट्रवादीची मात्र कोंडी झाली आहे. परंपरागत आघाडी असलेल्या काँग्रेस सोबत फारकत घेऊन राष्ट्रवादीने सत्तेत भागीदारी मिळविली. आत ही भागीदारीच संपुष्टात येते की काय अशी स्थिती आहे. सत्तेसाठी आघाडी स्थापन करून ‘वाटा-घाटी’ करणाऱ्या भाजप नेत्यानेही आपले हात वर केले आहे. विशेष असे, यवतमाळचा आगामी नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा, अशी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली आहे. ही मागणी करताना संख्याबळाची हमी भाजपा पदाधिकारी आणि नेत्यानी घेतली आहे.
राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपने संख्याबळ जुळविल्यास सत्तेतील मोठा भागीदार बाहेर निघणार आहे. त्यामुळे मागच्या अडीच वर्षात पदासाठी झालेली स्पर्धा कमी होणार आहे. पक्षासोबतच सत्तेसाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाला पद देण्याचेही नियोजन केले जात आहे. बहुमत काठावरचे असलेतरी कोणताच फरक पडणार नाही, असा सुर भाजपच्या गोटातून उमटत आहे.
भाजपाच्या स्वतंत्र खेळीला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने सहा सदस्यांना सोबत घेवून काँग्रेसेचे ११ सदस्य आणि बसपाच्या चार सदस्यांसोबत हात मिळवणी केल्यास त्यांनाही २१ हा काठावरच्या बहुमताचा आकडा गाठता येणे शक्य आहे. मात्र दरम्यानच्या काळात बरेच पाणी वाहून गेले आहे. बसपाचे सदस्य एकत्र नाहीत. हे समीकरण जुळवण्यासाठी ‘शक्ती’ खर्ची घालावी लागणार आहे. अशा स्थितीत बंडखोरी होण्याची चिन्हे कमीच आहे. आज तरी भाजपाचे पारडे जड दिसत आहे. अपक्ष तीन, बसपाचे एक आणि शिवसेना-भाजपचे १७ सदस्य मिळून संख्याबळाचे गणित मांडले जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे धक्कातंत्र पाहता शेवटच्या क्षणी यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेच्या राजकारणातील दोन मात्तबर आहेत. नवख्यांची दाणादाण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ते दोघे एकत्र आल्यास काहीही शक्य होऊ शकते, हा धोका ओळखुनच भाजपाकडून प्रत्येक पावित्रा सावधतेने घेतला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: BJP unanimously elected NCP holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.