पुसदमध्ये भाजप कार्यकर्ते रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:11+5:302021-05-07T04:44:11+5:30
पुसद : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर व घरांवर हल्ला चढवून जाळपोळ, हिंसा केली. ...
पुसद : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर व घरांवर हल्ला चढवून जाळपोळ, हिंसा केली. महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करून विनयभंग केला. या घटनेच्या निषेधार्थ येथे भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
भाजप, किसान मोर्चाचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख महेश नाईक यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी स्थानिक बसस्थानक परिसरातील महात्मा फुले चौक येथे घोषणा दिल्या. यावेळी महेश नाईक यांनी तृणमूल कार्यकर्त्यांनी चालविलेल्या हिंसाचाराचा निषेध करताना या हिंसाचाराला ममता सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप केला.
आंदोलनात भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजित सरनाईक, विजय पुरोहित, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष बाळासाहेब उखळकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर वानखेडे, जिल्हा सचिव लक्ष्मण आगाशे, उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा महामंत्री संजय पांडे, आध्यात्मिक आघाडीचे राज्य सदस्य संतोष आर्य, राम जन्मभूमी अभियानचे शहराध्यक्ष हरीश चौधरी, विधिसेलचे ॲड. कैलास वानखडे, किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री संजय लोंढे, विलास वानखडे, चंद्रकांत कांबळे, प्रशांत देशपांडे, महिला आघाडीच्या पल्लवी देशमुख, कांचन देशपांडे, कल्पना वाघमारे आदी सहभागी होते.