कामचुकार कंत्राटदार पालिकेत ‘ब्लॅक लिस्टेड’

By admin | Published: June 29, 2017 12:11 AM2017-06-29T00:11:22+5:302017-06-29T00:11:22+5:30

शहरातील झोन क्र.१ व २ मध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून मागील काही दिवसांपासून स्वच्छतेचे काम पूर्णत: बंद करण्यात आले.

'Black Listed' in 'Kamchukar Contractor' | कामचुकार कंत्राटदार पालिकेत ‘ब्लॅक लिस्टेड’

कामचुकार कंत्राटदार पालिकेत ‘ब्लॅक लिस्टेड’

Next

सर्वसाधारण सभा : एकाच कंत्राटदारावर संपूर्ण शहर स्वच्छतेची जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील झोन क्र.१ व २ मध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून मागील काही दिवसांपासून स्वच्छतेचे काम पूर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे शहरातील या भागात घाण पसरली होती. काम न करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा नगरपरिषदेत घेण्यात आली. या सभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेवून संपूर्ण शहराचे काम दुसऱ्या संस्थेच्या ठेकेदाराला देण्याचे ठरले.
गाडगे महाराज स्वच्छता व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था सफाईचे काम करत नसल्याने अनेक प्रभागांमध्ये कचरा साचला आहे. प्रभागात सफाई कामगार येत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोठी समस्या निर्माण झाली. याबाबत नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून विशेष सभेची मागणी केली. या सभेत सर्वानुमते गाडगे महाराज संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत झोन तीन व चारमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे तात्पुरती जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर स्वच्छतेसाठी वाढीव क्षेत्रासह संपूर्ण भागाकरिता तातडीने निविदा प्रक्रिया राबवून परिपूर्ण कंत्राट देण्याचाही ठराव सभेत घेण्यात आला. त्यानंतर शहरातील हागणदारीमुक्त करण्यासाठी जवाईनगर तलावफैल, राजारामनगरचे खुले मैदान, नेताजीनगर परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ठराव चर्चेसाठी आला. तसेच यवतमाळ शहर हागणदारीमुक्तची घोषणा करण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आला. यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मुळात वैयक्तिक शौचालय योजनेतील अनेक लाभार्थ्यांना वेळेत मोबदला न मिळाल्याने शौचालयाचे काम रखडल्याचे सदस्यांनी सांगितले. पालिका चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. वैयक्तिक शौचालय योजना परिपूर्णरित्या राबविल्याशिवाय पालिकेने शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करू नये, असा आक्षेप नगरसेवकांनी नोंदविला.
स्वच्छतेच्या कामकाजावरून वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेवून मागील सहा महिन्यात केवळ नगरपालिका प्रशासन या भागातून कर वसुली करण्याचे काम करत आहे. येथे कुठलीही सोयीसुविधा पुरविली जात नाही. पुर्वीचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पालिकेने कार्यालयीन कामकाजात लावल्याने गैरसोय होत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. याबाबत वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांची स्वतंत्र बैठक सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्याचे ठरले. वॉर्डातील कर्मचाऱ्यांवरून काही नगरसेवकांमध्ये सभेतच तू-तू-मै-मै झाली. सभा सुरू असतानाच काही महिला निवेदन घेवून आल्या. मात्र सभेची गरिमा ठेवा, अशा प्रकारे कामकाज चालत नाही, असा सूर काही नगरसेवकांनी आवळला. इतकेच नव्हे तर सभा सुरू असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. स्वच्छतेच्या मुद्यावर सर्वच सदस्यांनी अतिशय आक्रमक भूमिका मांडली. पालिकेच्या प्रशासनात प्रचंड अनागोंदी असल्याने सर्वांनीच संताप व्यक्त केला.

Web Title: 'Black Listed' in 'Kamchukar Contractor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.