ब्लास्टिंगमुळे दारव्हात घरांना हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:28+5:30

शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दररोजच प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे.

Blasting shakes homes in Darwaza | ब्लास्टिंगमुळे दारव्हात घरांना हादरे

ब्लास्टिंगमुळे दारव्हात घरांना हादरे

googlenewsNext
ठळक मुद्देबागवाडीत गिट्टी खदाण : भिंतींना पडल्या भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरालगत असलेल्या बागवाडी शिवारातील गिट्टी खदानीतील ब्लास्टींगमुळे दारव्हा शहरातील काही घरांना दररोज प्रचंड हादरे बसतात. यामुळे शहरातील काही नगरातील नागरिक भयभीत झाले आहे. या ब्लास्टिंगमुळे भविष्यात विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दररोजच प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे. खदानीच्या काही अंतरावर वृंदावन, शिक्षक कॉलनी तसेच कृषी कॉलनी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टमुळे येथील घरांना जोरदार हादरे बसतात. त्यामुळे अनेक घरांना तडे गेले.
स्फोटाच्या आवाजाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी आशाच प्रकारे प्रचंड प्रमाणात स्फोट करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांना हादरे बसले. दररोज होणाºया स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गिट्टी खदानीत संबंधित कंपनी दगड फोडण्यासाठी दररोज ब्लास्ट करतात. यातून अनेकदा बारीक प्रमाणातील दगड अस्ताव्यस्त फेकले जातात. ब्लास्टच्या स्फोटामुळे प्रचंड आवाज होतो. या ब्लास्टचा मोठा हादरा बसतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वृंदावन, शिक्षक कॉलनी व कृषी कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहे. त्यांना अनर्थ घडण्याची चिंता सतावत आहे. घरांना तडे जात असल्याने घर पडण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे या तिन्ही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांनी दिले एसडीओंना निवेदन
गिट्टी खदानीतील ब्लास्टमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. सोमवारी परिसरातील नागरिकांनी खदानीची चौकशी करून तत्काळ ब्लास्टींग बंद करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी अमोल गायके, विलास भड, गजानन आमटे, प्रल्हाद राठोड, विलास पुरी, देवराव बोकडे, ए.बी. बारडे, जी.बी. कामानकर, जी.पी. डोंगरे, जी.बी. मेश्राम, पी.एस. लोहकरे, व्ही.एस. केळकर, आर.एम. डवले, ए.आर. बोरकर, डी.यू. घुगे, श्याम रोडे, बळीराम थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: Blasting shakes homes in Darwaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.