‘वायपीएस’मध्ये आशीर्वाद समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:55 PM2019-02-27T23:55:27+5:302019-02-27T23:56:54+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. वायपीएस शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश कोंडावार, माणिकराव भोयर आदी मंचावर उपस्थित होते.
पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली. रुक्साना बॉम्बेवाला यांनी परिक्षेसंबंधी आवश्यक सूचना यावेळी केल्या. दहावीचे विद्यार्थी नील बुटले, श्रृती भेंडारकर यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांतर्फे महेश जोशी, कविता माकेसना यांनी विचार मांडले. नववीच्या विद्यार्थ्यांनी विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात प्रेरणागीत सादर केले.
गतवर्षी शाळेतून उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विदर्भातून प्रथम आलेली ऋतुजा बाहेती, द्वितीयस्थानी राहिलेला आर्यन पालडीवाल आणि तृतीय स्थान प्राप्त श्रीमय दीक्षित व श्रेया बाजोरिया यांना रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी यावेळी संबोधित केले. त्यांनी काही काळापूर्वीचे आणि आताचे शिक्षण याची तुलना करताना विद्यार्थ्यांनी आता अधिक परिश्रम करण्याची गरज व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे नितीन श्रीवास्तव, प्राचार्य जेकब दास यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन समन्वयक अर्चना कढव यांनी केले, तर आभार संध्या सुब्रमण्यम यांनी मानले. अभिजित भीष्म यांनी मंच सजावटीची जबाबदारी पार पाडली.