सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी सरसावले पुसदमधील रक्तदाते

By admin | Published: January 15, 2016 03:18 AM2016-01-15T03:18:16+5:302016-01-15T03:18:16+5:30

सिकलसेल जनजागृती अभियान व सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन बाळाभाऊ जिल्हेवार स्मृती येथील आसेगावकर विद्यालयात मंगळवारी करण्यात आले होते.

Blood donation in petals for patients with sickle-stroke | सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी सरसावले पुसदमधील रक्तदाते

सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी सरसावले पुसदमधील रक्तदाते

Next

समाजशील उपक्रम : १३ दाते उचलणार १७ रुग्णांचा आर्थिक भार
पुसद : सिकलसेल जनजागृती अभियान व सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन बाळाभाऊ जिल्हेवार स्मृती येथील आसेगावकर विद्यालयात मंगळवारी करण्यात आले होते. यावेळी २४ जणांनी सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान केले, तर १३ रक्तदात्यांनी सिकलसेल रुग्णांसाठी होणारा एक वर्षाचा आर्थिक भार उचलण्याचा संकल्प केला.
अध्यक्षस्थानी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानव सेवा समितीचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, डॉ. सतीश चिद्दरवार, राजेश अग्रवाल, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुबेवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. जय भोपी, प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष शीतलकुमार वानखेडे, प्रा. विलास जिल्हेवार, मारोती भस्मे उपस्थित होते. यावेळी समाजऋण फेडण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत रक्तदान केले, तर रुग्णांचा आर्थिक भार उचलण्यासाठी विनोद जिल्हेवार, दीपक आसेगावकर, डॉ. मोहम्मद नदीम, अ‍ॅड. माधव माने, वासवी डेव्हलपर्स, भारत पाटील, संतोष आर्य, अ‍ॅड. उमाकांत पापीनवार, सुरज डुबेवार, विश्वास भवरे, रश्मी पानपट्टे, शिवाजी पवार, विवेक मन्नरवार, सुभाष कोसलगे आदींनी वर्षभराचा खर्च उचलण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला विश्वजीत सरनाईक, बाळासाहेब उखळकर, भारत पाटील, संतोष मुकेश, अमर चिद्दरवार, गजानन चिंतावार, संदीप जिल्हेवार, बाळाभाऊ सोमावार, विक्रांत जिल्हेवार, अनिल डुबेवार यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Blood donation in petals for patients with sickle-stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.