‘जेडीआयईटी’च्या रासेयो शिबिरात विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:15+5:30
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सोनखास येथे सुरू झाले आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरात गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिवाय मधुमेह तपासणी शिबिर यावेळी घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सोनखास येथे सुरू झाले आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरात गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिवाय मधुमेह तपासणी शिबिर यावेळी घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच सावित्री गणेश खाडे, प्रा.डॉ. बाळकृष्ण सरकटे, ग्रामसेवक टी.आर. भारती, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती हेमंतराव कोटनाके, पोलीस पाटील दिनेश पारधी, उपसरपंच बरखा कोटनाके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता पांडुरंग भोयर, मुख्याध्यापक प्रकाश वेळूकार, देवीदास झोड, सुभाष लोखंडे, विष्णू सूर, ग्रामपंचायत सदस्य रत्ना येलके, वर्षा लोखंडे, प्रकाश तिपाले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी रासेयो शिबिराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. रक्तदान व मधूमेह तपासणी शिबिरासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूसह बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक आदी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी प्रा. दिव्या शेंदरे, प्रा. धनंजय तुळसकर, प्रा. सागर जिरापुरे, प्रा. जितेंद्र सावंत, प्रा. नवनाथ करचे, प्रा. मयूर जिरापुरे आदी उपस्थित होते.