पुसदमध्ये ‘माणुसकीची भिंत’तर्फे रतक्तदात्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:28 AM2021-06-24T04:28:19+5:302021-06-24T04:28:19+5:30
पुसद : राजमाता जिजाऊ माँसाहेब व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘माणुसकीची भिंत’ सोशल फाउंडेशनच्या वतीने जिजाऊ सृष्टी शांताबाई ...
पुसद : राजमाता जिजाऊ माँसाहेब व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘माणुसकीची भिंत’ सोशल फाउंडेशनच्या वतीने जिजाऊ सृष्टी शांताबाई दत्तात्रय जाधव बाग येथे रक्तदात्यांना गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी दत्तात्रय जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहिनीताई इंद्रनील नाईक, दिगंबर जगताप, प्रभाकर टेटर, परशराम नरवाडे, यशवंत देशमुख, पंकजपाल महाराज, अल्काताई भिताडे, संतोष जाधव, शांताबाई जाधव, शीला वाकोडे उपस्थित होते. याप्रसंगी पंकज पाल महाराज यांनी दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा एक बॉटल रक्तदान करणे, हे १० यज्ञ करण्यापेक्षा मोठे काम असल्याचे सांगितले. यावेळी जास्तीत जास्तवेळा रक्तदान करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यात गिरीश अनंतवार, शरद पवार, मारुती भस्मे, अजय पुरोहित, बिपिन चिद्दरवार, रवी घड्याळे, प्रा. संतोष जाधव, प्रा. माधव खिल्लारे, प्रा. स्वातीताई वाठ, ऋषिकेश टनमने, रमेश पंडित, शांतिसागर इंगोले, विकास चव्हाण, संदीप शिंदे, हरिश चौधरी, चैतन्य यशवंतकर, सागर भागवत, अविनाश मस्के, लक्ष्मण गायकवाड, रितिक जयस्वाल, अक्षय सांबरे, विजय खुडे, राजू गायकवाड, अक्षय तायडे, प्रवेश टाकरस, कासिम भाई, राहुल काटकर, आशिष सांबरे, किशोर राठोड, दिनकर दमकुंडवार, राहुल माहुरे, पवन बोजेवार, विशाल घाटे, महेश बजाज, अंकुश भलंगे, संजय भंडारी, विशाल ढाके यांना सन्मानित करण्यात आले.
माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव, जगत रावल, संतोष गावंडे, प्रमोद ठाकूर, संतोष भेंडे, सोहम नरवाडे, प्रतीक चव्हाण, विजय खंदारे, अभिजित पानपट्टे, प्रभाकर ठाकरे, दीपक काळे, शंकर गावडे, नितीन पवार, सुशांत महल्ले, जीवा जाधव, संतोष जाधव, अनिल गिरे, कुलदीप गावंडे, करण ढेकळे, पंजाब ढेकळे, प्रल्हाद वांझाळ, अरविंद देशमुख, उदय मगर, संजय गावंडे, मुरलीधर ढगे, नितीन जाधव, विजय खंदारे, शुभम जाधव, आदित्य जाधव, मोनिका जाधव, मोना रावल, रेखा आगलावे, अर्चना गावंडे, शीला वाकोडे, प्रियंका बेले, अलका भिताडे, वैष्णवी जाधव, शिव जाधव, हेमंशू रावल, क्रिश आगलावे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील ठाकरे यांनी केले.