शासनाच्या रक्तात दातृत्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:14 PM2018-01-20T23:14:02+5:302018-01-20T23:14:12+5:30

शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.

The blood of government does not have a pair of darts | शासनाच्या रक्तात दातृत्व नाही

शासनाच्या रक्तात दातृत्व नाही

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दिले रक्त : तरूणाने व्यक्त केला संताप, तिरंगा चौकात चक्री धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.
येथील तिरंगा चौकात शेतकरी संघर्ष समितीने अभिनव चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी दुसऱ्या दिवशी समिती सदस्य व शेतकऱ्यांनी सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी म्हणून रक्तदान केले. यावेळी जवळपास २५ शेतकऱ्यांनी रक्तदान केले. शेतकऱ्यांच्या रक्तात मदतीचा, दातृत्वाचा डीएनए असून सरकारच्या रक्तात मात्र मदतीचा, दातृत्वाचा डीएनएच नाही, असा आरोप शेतकºयांनी केला. सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी, शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण व्हावी म्हणून हे रक्तदान असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी देशोधडीला लागत असताना सरकार मूग गिळून आहे. हे सरकार अत्यंत कोडगे झाले. सरकारमध्ये गब्बरसिंग बसले आहेत. यात काही मुंबईत, तर काही दिल्लीत बसले आहे. ते शेतकऱ्यांना लुटायचे काम करीत आहे, असा आरोप शेतकºयांनी केला. यावेळी पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सरकारवर आसूड ओढताना विविध उदाहरणे देत सरकारचा कोडगेपणा दर्शविला. देशभक्ती, भारत माता की जय, गोवंश संरक्षण, आदींच्या नावाखाली सरकार दहशत पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा.घनश्याम दरणे, अशोक बोबडे, स्वाती येंडे, माधुरी अराठे, जितेंद्र मोघे, दिनेश गोगरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
युवकाने रक्त फेकून केला निषेध
रक्तदान सुरू असताना बिशन शिंदे नामक शेतकऱ्याने हाताची सुई काढून रक्ताची पिशवी तेथील फलकावर फेकून शासनाचा निषेध केला. या फलकांवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या सरकारने केवळ शेतकऱ्यांचे रक्त शोषणाचेच काम केले असून मदतीचा हात दिला नाही. आता सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. नंतर शिंदे यांना उपचारार्थ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आंदोलन मंडपात काही काळ गोंधळ उडाला होता.

Web Title: The blood of government does not have a pair of darts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.