दारूड्या पतीचा मुलांच्या मदतीने खून

By admin | Published: June 3, 2016 02:32 AM2016-06-03T02:32:52+5:302016-06-03T02:32:52+5:30

दारूड्या पतीच्या असह्य त्रासाने त्रस्त झालेल्या महिलेने आपल्या दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना

Blood with the help of drunken children | दारूड्या पतीचा मुलांच्या मदतीने खून

दारूड्या पतीचा मुलांच्या मदतीने खून

Next

वरझडीची घटना : पत्नीसह दोन मुलांना अटक
वणी : दारूड्या पतीच्या असह्य त्रासाने त्रस्त झालेल्या महिलेने आपल्या दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना तालुक्यातील वरझडी येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी पत्नीसह दोन मुलांना अटक केली आहे.
बापूराव आदे (४५) रा. वरझडी असे मृताचे नाव आहे. तर पत्नी वृंदा बापूराव आदे, मुलगा साजन बापूराव आदे (२४), मुलगी रोशनी बापूराव आदे (२१) असे आरोपींचे नावे आहेत. बापूराव आदे आपल्या परिवारासह वरझडी येथे राहत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. दारू प्राशन करून तो पत्नी वृंदाला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तसेच दारूच्या नशेत बापूराव पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. यावरून या दोघात नेहमी खटके उडत होते. मुले मोठी असल्याने त्यांच्या समोर बापूराव वृंदाला नेहमी त्रास देत होता. त्यामुळे तिचा संयम ढळला.
बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बापुराव नेहमीप्रमाणे दारू प्राशन करून घरी आला. त्याने भांडण सुरू करून चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. यात दोघात चांगलाच वाद सुरू झाला. याच वादात रागाच्या भरात वृंदाने लोखंडी रॉड हाती घेऊन बापुराववर प्रहार केला. तिला साजन व रोशनी या दोन मुलांनी सहकार्य केल्याचा आरोप आहे. रॉड वर्मी लागल्याने बापुराव गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच वृंदा आदे साजन आदे, रोशनी आदे या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती. वरझडी येथे घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपास शिरपूर पोलीस करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Blood with the help of drunken children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.