ट्यूशनला गेलेल्या विद्यार्थ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:30 PM2017-10-14T14:30:33+5:302017-10-14T14:32:35+5:30

ट्यूशनला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेहच शनिवारी सापडला. त्याचा दगडाने ठेचून निर्घृण घून करण्यात आल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून स्पष्ट झाले. हा प्रकार यवतमाळच्या भोसा रोड येथील सुरजनगर भागात उघडकीस आला.

Blood of tuition student | ट्यूशनला गेलेल्या विद्यार्थ्याचा खून

ट्यूशनला गेलेल्या विद्यार्थ्याचा खून

Next
ठळक मुद्देमृत्यूमागील कारण गुलदस्त्यातसायकलही बेपत्ता

यवतमाळ: ट्यूशनला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेहच शनिवारी सापडला. त्याचा दगडाने ठेचून निर्घृण घून करण्यात आल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून स्पष्ट झाले. हा प्रकार यवतमाळच्या भोसा रोड येथील सुरजनगर भागात उघडकीस आला.
अभिजित दीप टेकाम (१२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहाव्या इयत्तेत शिकत होता. शुक्रवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता तो ट्यूशनसाठी घरातून निघाला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. मात्र तो सापडला नाही. शनिवारी सकाळी डेहनकर ले आऊट भागातील सूरजनगर येथे एका पडीक जमिनीवर त्याचा मृतदेहच आढळून आला. त्याच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने त्याचा दगडाने खून केल्या असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
अभिजित हा केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. ज्या सायकलवरून तो ट्यूशनला गेला ती सायकलही अद्याप सापडलेली नाही. त्याचे वडील हे वीज महावितरण कंपनीत आॅपरेटर पदावर आहेत. कळंब तालुक्यातल्या वेणीकोठा येथील ३३ उपकेंद्रावर त्यांची नेमणूक आहे. अभिजितच्या मृत्यूमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Blood of tuition student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.