संकटमोचन परिसरात तरुणाचा निर्घृण खून

By admin | Published: August 12, 2016 02:04 AM2016-08-12T02:04:43+5:302016-08-12T02:04:43+5:30

येथील बांगरनगरातील तरुणाच्या खुनाची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून तर दुसऱ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला.

The bloodless youth of the Sankatmokhan area | संकटमोचन परिसरात तरुणाचा निर्घृण खून

संकटमोचन परिसरात तरुणाचा निर्घृण खून

Next

यवतमाळात खुनाची मालिका : एक जण गंभीर, दोघांना अटक
यवतमाळ : येथील बांगरनगरातील तरुणाच्या खुनाची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून तर दुसऱ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला. एकाच आठवड्यात झालेल्या खुनाच्या दोन घटनांनी यवतमाळ शहर हादरले आहे. दरम्यान या खुनातील दोन आरोपींना वडगाव रोड पोलिसांनी अटक केली आहे.
अमित दीपक पलटनकर (२६) रा. संकटमोचन परिसर उमरसरा असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आशिष ज्ञानेश्वर पलटनकर (२९) रा. संकटमोचन परिसर असे जखमीचे नाव आहे. अमित आणि आशिष हे दोघे चुलत भाऊ असून त्यांचा संकटमोचन परिसरात पानठेल्याचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास आरोपी नाना अंकुश रोडे, मयूर उर्फ चिनी पुसनाके, संजय उर्फ बारक्या दत्ता शिंदे, संजय उर्फ जांग्या प्रकाश कालनकर सर्व रा. उमरसरा यांनी अमितला मारहाण सुरू केली. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी मारहाण करण्यात आली. त्यावेळी आशिष पलटनकर भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या हातावर एकाने चाकूचा वार केला. तर इतरांनी आशिषला बेदम मारहाण केली. फर्शी, कुंडी उचलून अमितच्या छातीवर आदळली. एवढेच नाही तर चाकूनेही भोसकले. यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी आशिषने अमितला एका आॅटोरिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. नागपूरला नेत असताना वाटेतच अमितचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आशिष पलटनकर याच्या तक्रारीवरून सुरुवातीला वडगाव रोड पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविला होता. मात्र आता अमितच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर वडगाव रोडच्या शोध पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी उमरसरा परिसरातच दडून असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी पथकातील नीलेश राठोड यांच्या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, रावसाहेब शिंदे, सुरेश मेश्राम, आशिष चौबे, गौरव नागलकर यांनी आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी संजय उर्फ बारक्या शिंदे आणि संजय उर्फ जांग्या कालनकर या दोघांना अटक केली.
या गुन्ह्याचा तपास ठाणेदार देवीदास ढोले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. मृत अमित पलटनकर याच्यावरही पोलीस दप्तरी गुन्हे आहेत. काही दिवसापूर्वी त्याला तलवारीच्या बळावर दहशत पसरविताना अटक करण्यात आली होती. (कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: The bloodless youth of the Sankatmokhan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.