यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार! पतीने पत्नीला, मुलाने बापाला संपविले; ६ महिन्यात ४४ जणांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 04:04 PM2022-07-25T16:04:25+5:302022-07-25T16:06:14+5:30

दोन खुनांनी जिल्हा हादरला

Bloody thrill in Yavatmal! The husband killed the wife, the son killed the father | यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार! पतीने पत्नीला, मुलाने बापाला संपविले; ६ महिन्यात ४४ जणांचा खून

यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार! पतीने पत्नीला, मुलाने बापाला संपविले; ६ महिन्यात ४४ जणांचा खून

Next

दिग्रस (यवतमळा) : खुद्द पोटच्या मुलानेच लोखंडी रॉडने जन्मदात्याच्या डोक्यावर प्रहार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या पित्याने काही क्षणातच जीव सोडला. मनाला हादरवून टाकणारी ही घटना तालुक्यातील बेलोरा येथे शुक्रवारी घडली.

गणेश महादेव काशिदकर (५०) रा. बेलोरा असे मृत पित्याचे नाव आहे. राहुल गणेश काशिदकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. मृत गणेश काशिदकर पत्नी व मुलासह दिग्रस येथे वास्तव्याला आहे. बेलोरा येथे त्यांची शेती आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते शेती पाहण्यासाठी बेलोरा येथे गेले होते. त्यांच्या पाठोपाठ मुलगा राहुलही बेलोरा येथे पोहोचला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गणेश हे बेलोरा येथील घरात बसून होते. त्याचवेळी राहुल तेथे धडकला. त्याने अचानक वडिलांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करणे सुरू केले. यात रक्तबंबाळ होऊन गणेश खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राहुलने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून दिग्रसला पळ काढला.

दरम्यान, शुक्रवारी गणेश दिग्रसच्या घरीच परतले नाहीत. त्यामुळे आरोपी राहुलनेच दुसऱ्या दिवशी शनिवारी बेलोरा येथे आपल्या काकांना फोन केला. बाबा अद्याप घरी आले नाहीत, बेलोरा येथील घरी आहेत का, असे त्याने काकांना विचारले. तसेच बेलोरा येथील घरी जाऊन बघण्याची विनंती केली. राहुलचे काका घरी गेले असता दरवाजा बाहेरून बंद होता. त्यांनी कडी उघडून आत प्रवेश करताच गणेश मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे शनिवारी सायंकाळी दिग्रस पोलिसांना माहिती देण्यात आली; मात्र पोलिसांनीही चालढकल केली. पोलीस रविवारी सकाळी बेलोरा येथे पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी राहुल काशिदकरविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

वडील मद्यपी असल्याने खून केल्याची कबुली

पोलिसांनी आरोपी मुलगा राहुल गणेश काशिदकर याला रविवारी ताब्यात घेतले. त्याने वडील मृतक गणेश काशिदकर मद्य प्राशन करून नेहमी आईला त्रास देत होते, असे सांगितले. आईचा त्रास सहन न झाल्याने वडिलांचा खून केल्याची कबुली राहुलने पोलिसांसमक्ष दिली आहे. 

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीला संपविले अन् गावात येऊन सांगितले

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना नेर तालुक्यातील खोलापुरी येथे रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. कमला मोहन राठोड (५०, रा. खोलापुरी) असे या महिलेचे नाव आहे. खुद्द मारेकरी पतीनेच आपण पत्नीचा खून केल्याचे गावात येऊन सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पुढे आली आहे.

मृत कमला व तिचा पती मोहन सोमला राठोड (५२) यांच्यात नेहमी वाद होत होता. शनिवारी रात्रीही या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी कमला घराबाहेर निघून गेली. पती मोहनने तिचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी तो सोबत कुऱ्हाड घेऊनच निघाला.

७ वाजण्याच्या सुमारास ती पती मोहन राठोड याला गावातील देवस्थानाजवळ आढळली. याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी मोहनने कमलाच्या कमरेवर, पोटावर कुऱ्हाडीने वार करून जीवानिशी ठार केले. हा प्रकार त्याने गावात सांगितला. खोलापुरीचे पोलीस पाटील सुभाष दलपत चव्हाण यांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल केला.

मृत कमला व मोहनला दोन अपत्ये आहेत. मुलीचे लग्न झाले असून, मुलगा पुणे येथे आहे. पती, पत्नी हे दोघेच घरी राहात होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर, महेश तडसे करीत आहेत.

Web Title: Bloody thrill in Yavatmal! The husband killed the wife, the son killed the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.