बोअरला १७ फुटांवर पाणी अन् कारंजे उडाले ३७ फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:04+5:30
सेवानिवृत्त एसटी वाहक नामदेव पराते यांच्या घराचे येथील गांधीनगरात बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सोमवारी बोअर खोदण्यात आली. अवघ्या काही मिनिटात या बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी लागले. त्याचवेळी किमया घडली ती अशी खोदकामही थांबवावे लागले. बोअरमधून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा होता की चक्क ३७ फुटांपर्यंत पाण्याचे कारंजे उडायला लागले.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : उन्हाळ्याची चाहुल लागताच भूगर्भातील पाण्याची पातळी खोल चालली आहे. मात्र नेरमध्ये निसर्गाची किमया पहायला मिळाली. बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी आणि ३७ फुटांवर कारंजे उडाल्याचा प्रकार घडला. याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
चिखली(कान्होबा) येथील रहिवासी व सेवानिवृत्त एसटी वाहक नामदेव पराते यांच्या घराचे येथील गांधीनगरात बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सोमवारी बोअर खोदण्यात आली. अवघ्या काही मिनिटात या बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी लागले. त्याचवेळी किमया घडली ती अशी खोदकामही थांबवावे लागले. बोअरमधून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा होता की चक्क ३७ फुटांपर्यंत पाण्याचे कारंजे उडायला लागले.
बराचवेळपर्यंत पाणी न थांबल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. काही तासानंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला. १५५ फुटांपर्यंत बोअर खोदली गेली. बोअरमधून कारंजे उडताना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि ये-जा करणाऱ्यांची गर्दी झाली होती.
भूजल पातळीचा अंदाज
नेर शहरातील गांधीनगर भागात मोठ्या प्रमाणात खुले प्लॉट आहे. तसेच काही ठिकाणी सखल भाग असून पावसाचे पाणी बºयाचअंशी जमिनीत मुरते. पराते यांच्या प्लॉटवर बोअर करताना लागलेले पाणी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. साधारणत: ७० फुटाच्या पुढेच ओलावा लागतो असा अनुभव आहे.