बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:43 PM2019-02-18T21:43:20+5:302019-02-18T21:43:34+5:30

तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Bogs seeds hit farmers | बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

Next
ठळक मुद्देटरबूज बियाण्यांचा दगा : चार गावातील शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
टरबूज पिकाला अल्प फुल व जी फळे आलीत ती वाकडीतिकडी आढळून आली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन व नियोजन करुनही या दोषाचे प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निर्देशनास आले.
निंबी पारडी, भोजला ही तीन गावे टरबुजच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहे. चांगल्या गुणवत्ता पूर्ण टरबुजाचे पीक गावातील शेतकरी घेतात. परंतु यावर्षीच्या संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे. या बोगस बियाण्याला एकूण २२ शेतकरी बळी पडलेले आहे. या बोगस बियाण्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याने शेतकरी चिंतातुर व अस्वस्थ झालेला आहे.
शेतकºयांच्या नुकसानीची कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर बियाणे कंपनीकडून लागवड खर्च व येणारे उत्पन्न वसूल केले जाईल, असे आश्वासन किशोर तिवारी यांनी शेतकºयांना दिले. यावेळी तिवारी यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या सोबत चर्चा केली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून तातडीने दखल घेऊन शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, विलंब झाल्यास हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनीष जाधव यांनी दिला. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील हे बोगस बियाणे, किटकनाशकची मालिका थांबायचे नाव घेत नाही. संबंधित यंत्रणाच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप मनीष जाधव यांनी केले आहे .
यावेळी एसडीओ नितीन हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, तालुका कृषी अधिकारी धुळधुळे, गटविकास अधिकारी गवई, तालुका कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, प्रा.महादेव गावंडे, संजय कुंभारे, हेमंत ठाकरे, निखिल ठाकरे, विजय राऊत, भालचंद्र पेन्शनवार, जिजाबाई गावंडे , विशाल ठाकरे, गजानन ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Bogs seeds hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.