कळंब शहरात बोगस डॉक्टरांची ‘दुकानदारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:00 AM2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:06+5:30

कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसतांना ही मंडळी सर्रासपणे ऑलोपॅथीची औषधी लिहून देतात. हा प्रकार जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र आहे. पुर्वी बीएएमस झालेले डॉक्टर मंडळी केवळ औषधी लिहून द्यायचे. परंतु आता या डॉक्टरांनी चक्क रुग्णांना भरती करुन उपचार सुरु केला आहे.

Bogus Doctors 'Shop' in Kalamba City | कळंब शहरात बोगस डॉक्टरांची ‘दुकानदारी’

कळंब शहरात बोगस डॉक्टरांची ‘दुकानदारी’

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष : रुग्णांची खुलेआम आर्थिक पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहरात सध्या बोगस डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात दुकानदारी थाटली आहे. संबधित विषयाचे कुठलेही शिक्षण नसताना डॉक्टर मंडळी चक्क सलाईन लाऊन रुग्णांची आर्थीक पिळवणूक करतआहे. याकडे स्थानिक आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसतांना ही मंडळी सर्रासपणे ऑलोपॅथीची औषधी लिहून देतात. हा प्रकार जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र आहे. पुर्वी बीएएमस झालेले डॉक्टर मंडळी केवळ औषधी लिहून द्यायचे. परंतु आता या डॉक्टरांनी चक्क रुग्णांना भरती करुन उपचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे रुग्णांना तुटपुंज्या जागेत झोपवून सलाईन लावली जाते, त्यांचेकडून हजारो रुपये उकळले जात आहे.
कळंब येथील जोडमोहा रोडवरील एका महिला डॉक्टरने हा प्रकार राजरोसपणे सुरू केला आहे. ‘हायडोज’ देण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. येथे सर्व प्रकारच्या रुग्णांचे ‘समाधान’ केले जात असल्याची माहीती आहे. यासाठी त्यांच्याच नातेवाईकांचे मेडीकल स्टोअर्स उघडण्यात आले. रुग्णांना येथूनच औषधी विकत घेण्याची सुचना केली जाते. या महिला डॉक्टर रुग्णांवर जो औषधोपचार करतात त्यांच्याकडे त्यासंबधीचे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही. असे असताना हा प्रकार आरोग्य यंत्रणेच्या नाकावर टिच्चुन सुरू आहे.

ग्रामीण भागातही बोगस डॉक्टरकी
कळंब तालुक्यामध्ये पिंपळगाव (रुईकर), कात्री, सावरगाव, आमला, कोठा, डोंगरखर्डा या गावामध्ये बंगाली डॉक्टरांनी धुमाकुळ घातला आहे. कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसताना ही मंडळी थेट ‘हायडोज’ देण्यात पटाईत आहे. बरेचदा रुग्णांवर याचा विपरीत परिणाम होतो. ही मंडळी आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात औषधीसूध्दा बाळगतात. हा औषधीसाठा येतो कुठुन याचा शोध घेण्याची गरज आहे.

‘तो’ आरोग्य सेवक पुन्हा मैदानात
काही दिवसापुर्वी येथे कार्यरत एका आरोग्य सेवकाने चक्क दवाखाना थाटला होता. तो गावा-गावात जाऊन रुग्णांवर उपचार करायचा. हा विषय ‘लोकमत’ने प्रकाशित करताच चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. परंतु आता पुन्हा हा आरोग्य सेवक कळंब तालुक्यात आपल्या मोटारसायकलने रुग्णांच्या शोधात व त्यांच्यावर उपचारासाठी भटकंती करीत आहे. त्याचे कार्यक्षेत्र निंभारा, आमला गावचार परिसर असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Bogus Doctors 'Shop' in Kalamba City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर