एसटीतून सवलतीत प्रवासाकरिता बोगस अपंग कार्डधारकांची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:31 PM2019-08-10T22:31:25+5:302019-08-10T22:31:48+5:30

बोगस कार्डच्या आधारे एसटीतून सवलतीत प्रवास करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाहकांनी अशा लोकांना पकडल्यानंतरही कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. यवतमाळ विभागात गेली काही महिन्यात २०० हून अधिक प्रकरणे पुढे आली आहेत.

Bogus handicapped card holders travel for a discounted trip from ST | एसटीतून सवलतीत प्रवासाकरिता बोगस अपंग कार्डधारकांची धूम

एसटीतून सवलतीत प्रवासाकरिता बोगस अपंग कार्डधारकांची धूम

Next
ठळक मुद्देस्वाक्षरी बनावट। कार्डाची केवळ जप्ती, कारवाई होत नसल्याने मनोबल वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बोगस कार्डच्या आधारे एसटीतून सवलतीत प्रवास करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाहकांनी अशा लोकांना पकडल्यानंतरही कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. यवतमाळ विभागात गेली काही महिन्यात २०० हून अधिक प्रकरणे पुढे आली आहेत. या माध्यमातून बोगस कार्ड तयार करणाऱ्यांचे रॅकेट हाती लागू शकते. मात्र यासाठी एसटी प्रशासनाची उदासीनता कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते.
एसटी महामंडळाच्या अधिकृत पासवर नोंदणी क्रमांक, विशिष्ट कोड असतो. आगार व्यवस्थापकांच्या पदापुढे कंसात वरिष्ठ लावले जाते. या सर्व बाबी वाहकाने बारकाईने तपासल्यास कार्ड खरे की खोटे हे सापडते. अशाच प्रकारचे अनेक कार्ड वाहकांच्या हाती लागले आहे. केवळ कार्ड जप्त करून प्रकरण थांबले जाते. बाभूळगाव परिसरात प्रवास करत असलेल्या एका कार्डधारकाच्या कार्डवर ‘सीडब्ल्यूए’ऐवजी ‘सीओडब्ल्यूए’ असे नोंदविले गेले आहे. आगार व्यवस्थापकासमोर वरिष्ठ लावले गेले नाही. या आगारात कार्यरतच नसलेल्या आगार व्यवस्थापकाची स्वाक्षरी करण्यात आली आहे. यावरून सदर कार्ड बोगस असल्याचे स्पष्ट झाले. कार्डवर नाव असलेला व्यक्ती बोगस कार्ड देणारा असल्याची बाबही पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी बोगस कार्डवर प्रवास करणाºया व्यक्तीने याचा उलगडा केला. या व्यक्तीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी झाली असती तर बोगस कार्ड देणाºया टोळीचा पर्दाफाश झाला असता. वाहकांकडून अशा व्यक्तींना पकडले जाते, मात्र वरिष्ठांकडून त्यांना साथ मिळत नाही, असे सांगण्यात येते. बोगस असलेल्या कार्डावर आगार व्यवस्थापकाची स्वाक्षरीही बोगस आहे. आगार व्यवस्थापकांनाही याची खात्री पटलेली आहे. तरीही त्यांच्याकडून प्रकरण पोलिसात देण्यासाठी चालढकल केली जाते. केवळ खात्यांतर्गत पत्रव्यवहार करण्यात येतो. हा प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून गुन्हेगारांसारखी ट्रिटमेंट
बोगस पासवर प्रवास करत असलेल्या व्यक्तीविषयी तक्रार करण्यास गेलेल्या एसटीच्या अधिकारी व कर्मचाºयांना पोलिसांकडून आरोपीसारखी ट्रिटमेंट मिळत असल्याची ओरड आहे. तक्रार घेण्याऐवजी त्यांच्यावरच विविध प्रश्नांची सरबत्ती करून भंडावून सोडले जाते. तपासाची नाहक झंझट लागू नये यासाठी हा खटाटोप असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Bogus handicapped card holders travel for a discounted trip from ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.