व्हायरल इन्फेक्शनवर दीड कोटी गोळ्यांचा बूस्टर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 05:00 AM2022-02-14T05:00:00+5:302022-02-14T05:00:12+5:30

यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी आहे. 

Booster of 1.5 crore pills on viral infections! | व्हायरल इन्फेक्शनवर दीड कोटी गोळ्यांचा बूस्टर !

व्हायरल इन्फेक्शनवर दीड कोटी गोळ्यांचा बूस्टर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन ऋतूमधील बदलाच्या काळात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात जाणवते. सध्या थंडी आणि ऊन यातून व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे रुग्ण घरोघरी दिसत आहे. 
या रुग्णांना लागणारा औषधीसाठा प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठविण्यात आलेला आहे. जवळपास दोन कोटी गोळ्यांचा हा साठा जिल्ह्यात आहे. त्यात सर्वाधिक पॅरासिटामाॅल या तापेच्या गोळीची मागणी आहे. याशिवाय कॅल्शिअम आणि अँटिबायोटिक औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. 

व्हिटामिन सी, झिंकची मागणी वाढली
यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी आहे. 

जिल्ह्यात दोन महिन्यांचा औषधी साठा
- नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. समितीकडून तसा अहवालही आलेला आहे. यासाठी लागणारा निधी बीडीएसवर उपलब्ध आहे. औषधांची मागणी नोंदविण्यात आली आहे. 
- यामुळे पुढील काळात लागणारी औषधी लवकरच मिळेल. याशिवाय जिल्ह्याकडील दोन ते तीन महिने पुरेल एवढा औषधसाठाही शिल्लक आहे. गावपातळीवर आवश्यकतेनुसार वितरण सुरू आहे.

पुरेसा औषधसाठा
जिल्ह्याला लागणारा पुरेसा औषधसाठा तयार आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावरही आवश्यकतेनुसार गोळ्या पाठविण्यात आलेल्या आहे. 
- प्रल्हाद चव्हाण, 
जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

Web Title: Booster of 1.5 crore pills on viral infections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.