नेरमध्ये बोगस लाभार्थ्यांची पाठराखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:33 PM2017-10-29T22:33:01+5:302017-10-29T22:33:20+5:30

सुलभ शौचालयाचे बोगस लाभार्थी असल्याचे पुढे येऊनही नेर पंचायत समितीकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

Border Guard Bangladesh | नेरमध्ये बोगस लाभार्थ्यांची पाठराखण

नेरमध्ये बोगस लाभार्थ्यांची पाठराखण

Next
ठळक मुद्देसुलभ शौचालय : सिंदखेडमध्ये ५५ जणांनी घेतला लाभ, तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : सुलभ शौचालयाचे बोगस लाभार्थी असल्याचे पुढे येऊनही नेर पंचायत समितीकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. कुटुंबात एकाने बांधलेल्या शौचालयाचा फोटो इतरांनीही वापरून लाभ घेतला आहे. मात्र या प्रकरणाची साधी चौकशी करण्याचेही सौजन्य पंचायत समितीने दाखविले नाही. यावरून निधी वाटपात संगनमताने घोळ घातला असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
हागणदारीमुक्तीसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे. जनजागृती, आरोग्यावर परिणाम, प्रसंगी पोलीस कारवाई केली जात आहे. शिवाय शौचालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र याचा गैरवापर होत आहे. प्रती शौचालय १२ हजार रुपयांचा निधी देण्यात येत आहे. याचा योग्य वापर केला जात नाही. हा निधी हडपण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. असाच प्रकार तालुक्यातील सिंदखेड येथे पुढे आला आहे.
कुटुंबातील एकाने शौचालय बांधायचे आणि त्याच आधारे इतरांनी निधी लाटायचा, असा प्रकार या गावात घडला आहे. योजनेशी संबंधितांनीही कुठलीही शहानिशा न करता निधी मंजूर केला. दोन-तीन नव्हे, तर तब्बल ५५ लोकांना अशा प्रकारच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात काही जागरूक नागरिकांनी विचारणा केली असता ग्रामसेवकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ही बाब मिलन राठोड, धीरज राठोड, विष्णू राठोड, सचिन बनसोड यांनी पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. तरीही बोगस लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष पाहणी केल्यास सत्य पुढे येणार आहे. दरम्यान, स्पॉट व्हिजिटचे आदेश गटविकास अधिकाºयांनी संबंधितांना दिले असल्याची माहिती आहे. यानंतर होणाºया कारवाईकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

सिंदखेड येथे शौचालय निधी वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- युवराज मेहत्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नेर

Web Title: Border Guard Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.