सीमा जाधवने सर केले एव्हरेस्ट शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:21 PM2017-11-18T22:21:11+5:302017-11-18T22:21:30+5:30
जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम येथील सीमा संजय जाधव यांनी केला.
पुसद : जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम येथील सीमा संजय जाधव यांनी केला. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या यवतमाळ जिल्ह्यातील पहिल्या गिर्यारोहक ठरल्या आहे.
सीमा जाधव यांनी नेपाळ येथील १७ हजार ५०० फूट उंचीचे एव्हरेस्ट चढून उच्चांक गाठला. तत्पुर्वी सीमा यांनी अॅव्हरेज बेस कॅम्पमध्ये भाग घेतला. तेथे खडतर प्रशिक्षण घेतले. काठमांडू येथील लुकला विमानतळावर प्रशिक्षण पूर्ण केले. हा अवघड प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांनी चार महिने व्यायाम केले. प्रशिक्षक केदार गोगटे यांच्या मार्गदर्शनात ४० लोकांनी २९ सप्टेंबर रोजी त्यांनी एव्हरेस्टकडे कूच केली. ४ आॅक्टोबर रोजी त्यांनी एव्हरेस्ट सर केले, तर ११ आॅक्टोबरला त्या लुकला विमानतळावर पोहोचल्या. नंतर सर्वात एव्हरेस्ट शिखर सर करून यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली. त्या येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष के.डी. जाधव यांच्या स्नुषा होय.