उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:39 PM2019-02-27T12:39:36+5:302019-02-27T12:46:26+5:30

यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.

Borrowing of cotton on the life of farmers | उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेच्या धोरणाने झटका

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.
जागतिक बाजारातील कापसाचे दर आणि भारतातील दर सारखेच आहे. या स्थितीत अमेरिका भारतातील व्यापाऱ्यांना उधारीवर कापूस विकण्यास तयार आहे. या कापूस गाठीला तीन ते चार महिन्यांची सवलत मिळाली आहे. यामुळे चिन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धात अमेरिकेने भारतालाच ढाल बनवून भारतीय बाजारपेठ काबीज करणे सुरू केले आहे.
दोन वर्षांपासून अमेरिका याच पद्धतीने कापूस गाठींची विक्री करीत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना बसत आहे. हा प्रकार नियंत्रित करण्यासाठी कापसाच्या आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलावे, असे मत शेतकरी संघटनानी नोंदविले आहे. कृषी अभ्यासकांनी त्या दृष्टीने तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’कडे नोंदविले आहे.
उधारीवरील कापसामुळे देशभरात कापसाच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. गत तीन महिन्यापासून घसरण होत आहे. कापसाचे दर क्विंटलमागे ६०० रूपयाने घटले आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सहा हजार रूपये क्विंटलच्या वर जातील, असा अंदाज होता. मात्र अमेरिकेच्या व्यापार धोरणाने भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तानचे कापूस सौदे रद्द
भारतातून २० लाख कापूस गाठीची निर्यात होणार होती. यातील ७ लाख गाठीचे सौदे झाले. मात्र दहशतवादी घटनांमुळे दोन लाख गाठी थांबविण्यात आल्या. पुढील कालावधीत जाणारा कापूस यामुळे थांबणार आहे.

उधारीवरच्या २७ लाख गाठी देशभरात
बहुराष्ट्रीय कंपनीकडून भारतात येणाºया कापूस गाठीचे वितरण करण्यात येते. गतवर्षी २० लाख गाठी आयात झाल्या होत्या. यावर्षी याा गाठी २७ लाखांवर पोहचल्या आहे. यातून बाजारात कापसाचे दर पडले आहेत.


आयात होणाºया कापसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्याकरिता आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. किमान आधारभूत किमतीखाली शेतमालाची आयातच करू नये.
- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, वर्धा


कापसाच्या आयातीवर निर्बंधाचे प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. यामुळे २० टक्के कापसाची आयात झाली. यातही उधारीवर कापूस देशात आला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
- पाशा पटेल, अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग

Web Title: Borrowing of cotton on the life of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती