नेर व वाढोणा येथे दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 09:55 PM2017-10-21T21:55:36+5:302017-10-21T21:55:55+5:30
एकाने गळफास घेऊन, तर एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेर व वाढोणा(खुर्द) येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर/पारवा : एकाने गळफास घेऊन, तर एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेर व वाढोणा(खुर्द) येथे घडली.
नेर येथील टोलीपुरा भागातील राजू शंकर उरकुडे (४०) याने गळफास लाऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्वत:च्या राहत्या घरात त्याने गळफास लावला. आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे.
दुसरी घटना घाटंजी तालुक्यातील वाढोणा(खु) येथे घडली. किसन नथ्थूजी खडसंग (३७) याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी त्याने शेतात विष घेतले. संध्याकाळ झाल्यानंतरही घरी न परतल्याने शोध घेतला असता तो शेतात बेशुद्धावस्थेत आढळला. घाटंजी रुग्णालयात हलविले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.