पाेफाळी पाेलीस ठाण्यातच दोघांनी घातला वर्दीवर हात अन् अडकविण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:00 AM2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:02+5:30
सहायक फाैजदार प्रकाश भाेसले हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना दाेघे जण तेथे आले. त्यांनी काही एक न ऐकता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पाेलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आराेपींनी तू मध्ये बाेलणारा काेण, असे म्हणून थेट शिवीगाळ करून अंगावर हात घातला. पाेलीस ठाण्यातच आराेपींनी शिपायाची काॅॅलर पकडली. इतकेच नव्हे तर त्यांनी ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून थेट पाेलीस ठाण्यातील अंमलदार सहायक फाैजदारालाच धक्काबुक्की करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांना खाेट्या ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. हा प्रकार उमरखेड तालुक्यातील पाेफाळी पाेलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी घडला.
सहायक फाैजदार प्रकाश भाेसले हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना दाेघे जण तेथे आले. त्यांनी काही एक न ऐकता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पाेलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आराेपींनी तू मध्ये बाेलणारा काेण, असे म्हणून थेट शिवीगाळ करून अंगावर हात घातला. पाेलीस ठाण्यातच आराेपींनी शिपायाची काॅॅलर पकडली. इतकेच नव्हे तर त्यांनी ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर मस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आराेपी संताेष जनार्दन जाेगदंड (४१) रा. भांबपखेडा ता. पुसद, सुधाकर भीमराव लाेखंडे (५१) रा. शांतीनगर मुळावा ता. उमरखेड यांच्याविराेधात पाेलिसांनी कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
देशी दारूच्या भट्टीवर वाद घालणाऱ्यावर कारवाई
- मुळावा येथील मोहन श्रीराव जयस्वाल यांच्या दारू दुकानावर सुधाकर भीमराव लोखंडे (५१) व चंद्रकांत मोतीराम खडसे (३५) या दोघांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता फुकट दारू दे असे म्हणून वाद घातला होता. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरुन पोफाळी पोलीस ठाण्यात अमोल कान्हेकर याच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई का केली, असे म्हणत आरोपी संतोष जोगदंडे व सुधाकर लोखंडे या दोघांनी पोलीस ठाण्यात जावून थेट पोलीस शिपायावरच हात उचलला. यातील आरोपी संतोष जोगदंडे याला पोफाळी पोलिसांनी अटक केली आहे. सुधाकर लोखंडे हा पसार आहे.