पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:03 AM2019-05-11T00:03:00+5:302019-05-11T00:05:33+5:30

दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

The bottle taken by the container | पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

Next
ठळक मुद्दे३५ लाखांचे नुकसान : दिल्लीवरून हैद्राबादकडे जात होता कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.
हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसचा आर.जे.१०-जी.बी.२०५८ क्रमांकाचा कंटेनर दिल्ली येथील शोरूममधील चपला, बुट, दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर, आॅईलचे डब्बे, पंखे, खेळाचे साहित्य, सिडीजचे डब्बे, चपला, बुट तयार करण्याचा कच्चा माल व स्टेशनरी सामान घेऊन हैद्राबादकडे जात होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हैद्राबाद मार्गावरील वाय पॉर्इंटवर डाव्या बाजुला कंटेनर लावून चालक व क्लिनर शहरातील जवळच असलेल्या एटीएम केंद्रात पैसे आणावयासाठी गेले. पैसे घेऊन परत कंटेनरजवळ येत नाही तोच, त्यांना कंटेनरच्या कॅबिनमधून धुराचे लोट येताना दिसले. क्षणार्धात कंटेनरच्या कॅबिनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. हे दृष्य दिसताच, या रस्त्याने जाणाºया राजेश्वर पारीख व कुणाल राशतवार यांनी पोलीस व नगरपरिषदेला माहिती दिली. तोपर्यंत कॅबिनमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले.
त्यानंतर ही आग झपाट्याने कॅबिनच्या मागे असलेल्या कंटेनरमधील साहित्याकडे गेली. आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, पांढरकवडा नगरपरिषदेचे टँकर, फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कंटेनरमधील ५० टक्क्यापेक्षा जास्त साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेल्या वाय पॉर्इंटवर उभ्या कंटेनरला आग लागल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली होती. काही वेळ वाहतुकही ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण महल्ले व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
सध्या उष्णतामानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. आगी लागण्याच्या प्रमाणाताही वाढ होत आहे. कंटेनरला लागलेली ही आग अतिउष्णतेने शॉर्टसर्किट होऊन लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. कंटेनरची बॅटरी किंवा इंजिन गरम होऊन ठिणगी पडून ही आग लागली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसच्या मालकाला देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले. या आगीत ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: The bottle taken by the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग