नेर पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 09:53 PM2019-02-28T21:53:48+5:302019-02-28T21:54:37+5:30

नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात वेळेवर अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येणे शक्य नाही. हा मुद्दा घेऊन काँग्रेसने धरणे दिले.

The boycott on Ner Paulik's budget session | नेर पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेवर बहिष्कार

नेर पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेवर बहिष्कार

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे धरणे : सत्ताधारी म्हणतात, हा तर राजकीय स्टंट, सभा सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात वेळेवर अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येणे शक्य नाही. हा मुद्दा घेऊन काँग्रेसने धरणे दिले. तर काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करते, त्यांचा हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आली.
नगरपरिषदेच्या कुठल्याही सभेपूर्वी त्याची नोटीस व टिपणी नगरसेवकांना मिळावी, हा मुद्दा काँग्रेस नगरसेवकांनी लाऊन धरला होता. नेमकं अर्थसंकल्पीय सभेतही वेळेवरच अर्थसंकल्पाच्या कॉपीज् देण्यात आल्या. यावरून काँग्रेस नगरसेवक सलीम शहा यांनी सभागृहातून वॉकआऊट करून निदर्शने सुरू केली. पालिकेबाहेर नगरसेवक जफर एन. खान, इरशाद खान, फारूक दिवानजी, अन्सार खान, अतुल पिंपळकर, साजीद खाँ जबीउल्ला खाँ, रेहान खान, सत्यविजय गुल्हाने, फिरोज खान या नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले.
नगरपरिषदेत शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. संख्याबळाच्या भरवशावर अर्थसंकल्पीय सभा सुरू झाली. नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल व उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या उपस्थितीत २०१९-२० चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पीय सभेची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार असून काँग्रेसकडून केवळ राजकीय स्टंट केला जात असल्याचे नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर अर्थसंकल्पाचा अभ्यास व्हावा यासाठी त्याची प्रत चार दिवसांपूर्वीच नगरसेवकांना मिळणे अपेक्षित आहे. येथे ऐनवेळेवर प्रत देऊन मंजुरीसाठी ठेवली जाते, असे अ‍ॅड. सलीम शहा यांनी सांगितले.

३२ कोटी ६५ लाखांचा अर्थसंकल्प
नेर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक सुविधांवर अधिक भर देण्यात आला. पालिकेत ३२ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. २०१९-२० या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांचा येणारा निधी व खर्च होणारा निधी याचा लेखाजोखा मांडण्यात आला. २०१७-१८ या वर्षातील दोन कोटी ५७ लाख ५२ हजार रुपये नगरपालिकेकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. एकंदर अडीच कोटींच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी भरघोस तरतूद केली. यात पालिका शाळांसाठी नवीन डेस्क, बेंच, शालेय पुस्तके यांचा समावेश असल्याचे नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल व मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी सांगितले.

Web Title: The boycott on Ner Paulik's budget session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.