पंचायत समिती सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:59 PM2018-12-31T21:59:14+5:302018-12-31T21:59:28+5:30

अधिकार गोठविण्यात आल्याच्या विरोधात पंचायत समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी यवतमाळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार घातला. यामुळे सभाच बारगळली.

Boycott panchayat committee meeting | पंचायत समिती सभेवर बहिष्कार

पंचायत समिती सभेवर बहिष्कार

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळचे सदस्य : अधिकार आणि निधीसाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अधिकार गोठविण्यात आल्याच्या विरोधात पंचायत समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी यवतमाळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार घातला. यामुळे सभाच बारगळली.
चौदाव्या वित्त आयोगापूर्वी विकास कामासाठी पंचायत समित्यांना निधी मिळत होता. हा निधी पूर्ववत करण्यात यावा. सदस्यांना कामकाजासाठी ५० लाखांपर्यंत निधी मिळावा. वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यात याव्या. पंचायत समितीमधून विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व मिळावे, सभापती आणि उपसभापतींना स्वतंत्र निवासस्थान असावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
बहिष्कार आंदोलनात सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, नंदा लडके, कांता कांबळे, सुनंदा भुजाडे सहभागी होते. तर तीन सदस्य गैरहजर राहिले. बहिष्कारामुळे पंचायत समितीची नियोजन सभा बारगळली. यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Boycott panchayat committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.