ब्राह्मणगाव पीएचसीची वास्तू धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:38 PM2018-10-06T23:38:25+5:302018-10-06T23:39:11+5:30

तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. ग्रामस्थांनी याबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे.

Brahmingaon PHC's Vastu Dhaykhhat | ब्राह्मणगाव पीएचसीची वास्तू धूळखात

ब्राह्मणगाव पीएचसीची वास्तू धूळखात

Next
ठळक मुद्देराज्यमंत्र्यांना निवेदन : कोट्यवधी खर्चूनही उद्घाटनाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. ग्रामस्थांनी याबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे.
ब्राह्मणगाव येथील पीएचसीच्या वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊन दीड वर्षे लोटले. या वास्तूवर कोट्यवधींचा खर्च केला. मात्र अद्याप आरोग्य विभागाकडून वास्तू दुर्लक्षित आहे. त्यामुळे ब्राह्मणगाव व परिसरातील नागरिकांना आरोग्यसुविधांपासून वंचित राहावी लागत आहे. नुकतीच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट दिली. त्यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन देऊन समस्येकडे लक्ष वेधले.
ना.राठोड यांनी येथील पीएचसीसाठी पदभरती मंजूर नसून अर्धवट बांधकाम झालेल्या बोदेगावच्या पीएचसीला पदभरती मंजूर झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
ब्राह्मणगावच्या पीएचसीबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, डॉ.विश्वनाथ विणकरे, उपसरपंच गुलाबखॉ पठाण, परमात्मा गरूडे, रत्नाकर मुक्कावार, डॉ.वसंत कोंडरवार, शे.रफीक शे.हनिफ, माधव कोथळकर, राजकुमार विणकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Brahmingaon PHC's Vastu Dhaykhhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य