यवतमाळात समाज कल्याण लिपिकाविरुद्ध लाचेचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:54 PM2019-03-19T13:54:11+5:302019-03-19T13:54:44+5:30
येथील समाज कल्याणच्या सहायक उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विशाल बापूराव कुबडे याच्या विरोधात दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील समाज कल्याणच्या सहायक उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विशाल बापूराव कुबडे याच्या विरोधात दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.
एकस्तर प्रोत्साहन भत्त्याचे वेतन निश्चिती व थकबाकी काढून देण्याकरिता कुबडे याने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. पहिला हप्ता म्हणून पाच हजार रुपये देण्याचे ठरले. २ मार्च रोजी ही रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत १२ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी व १ मार्चला सलग तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत कुबडे यांनी केलेली लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यावरून यवतमाळात कुबडेविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.