माजी विद्यार्थ्यांनी दिला स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:50 AM2021-09-09T04:50:26+5:302021-09-09T04:50:26+5:30
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय बंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ.प्रदीप मेहता, सचिव श्याम पाटील, डॉ.अभय पाटील, प्राचार्य व्ही.एल. ...
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय बंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ.प्रदीप मेहता, सचिव श्याम पाटील, डॉ.अभय पाटील, प्राचार्य व्ही.एल. खळतकर उपस्थित होते. माजी विद्यार्थी प्रा.मधुकर वाघमारे, श्रीचंद राठोड, संजय दुद्धलवार, प्रा.दिनेश दाभाडकर, नितीन राऊत, जावेद पटेल, सुरेश चिरडे, अशोक अटल, गीता गावंडे, श्रद्धा लोखंडे, प्रीती गावंडे, ॲड.नरेश मोरे मंचावर विराजमान होते.
प्रथम दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक प्रा.अपर्णा पाटील यांनी केले. विजय बंग, डॉ.प्रदीप मेहता, प्राचार्य खळतकर यांनी मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त प्रा.मधुकर वाघमारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीचंद राठोड, प्रा.दिनेश दाभाडकर, जावेद पटेल, गीता गावंडे, श्रद्धा लोखंडे, सुरेश चिरडे यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सात माजी विद्यार्थ्यांनी देणगी जाहीर केली. संचालन प्रीतम गावंडे, आभार प्रा.एस.पी. बडवाईक यांनी मानले. यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रा.एस.पी. सोळंके, सचिव प्रा.जी.पी. खंडारे, समन्वयक प्रा.एस.पी. बडवाईक, प्रा.राजेंद्र कोठारी, प्रा.व्ही.डी. जाधव, प्रा.व्ही.आर. रोठे, प्रा.एम.एन. भगत, प्रा.डी.एस. साटोणे, प्रा.एन.एस. गायकवाड, प्रा.प्रा.डॉ.एस.पी. मोटे, प्रा.पी.व्ही. गडकर, प्रा.प्रवीण चांडक, प्रा.रूपेश कराडे, प्रा.सी.टी. जोगीया, प्रा.संजय देवस्थळे, प्रा.डी.डी. निल्लावार आदींनी परिश्रम घेतले.