सीबीएसईत चमकदार कामगिरी

By admin | Published: May 29, 2016 02:30 AM2016-05-29T02:30:06+5:302016-05-29T02:30:06+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

Brilliant performance in CBSE | सीबीएसईत चमकदार कामगिरी

सीबीएसईत चमकदार कामगिरी

Next

जान्हवी विदर्भात अव्वल : यवतमाळ पब्लिक स्कूलची १०० टक्के यशाची परंपरा कायम
यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यवतमाळातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी यात चमकदार कामगिरी केली. यवतमाळ पब्लिक स्कूलने १०० टक्के निकाल देत यशाची परंपरा कायम ठेवली तर स्कूल आॅफ स्कॉलर्स आणि केंद्रीय विद्यालयाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या जान्हवी जयप्रकाश राठी हिने विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलने गत सात वर्षांपासून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जान्हवी जयप्रकाश राठी हिने ९९.०६ टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. तर याच स्कूलचा विद्यार्थी सौरभ प्रदीप ठोकाडे आणि वेदांत लक्ष्मीकांत देशपांडे यांना ९९ टक्के गुण मिळाले आहे. तर आदित्य अंबाडकर आणि चैतन्य चावक या दोघांना ९८.०८ टक्के गुण मिळाले आहे.
वायपीएसचे दहावीच्या परीक्षेला १२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले आहे. वायपीएसच्या १५ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले.
स्कूल आॅफ स्कॉलर्स
यवतमाळ येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या १६४ विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले. लुम्बिनी फुलझेले ही ९७.२ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली. वेदांत राठोड याने ९७ टक्के गुण घेत द्वितीय स्थान मिळविले. अमन झांबड व खुशी भारती यांनी प्रत्येकी ९५.८ टक्के गुण घेत तृतीय स्थानी राहिले. पारूल डंभारे व ऋतुजा सातपुते यांनी प्रत्येकी ९५.२ टक्के गुण प्राप्त करत चौथे स्थान मिळविले. अथर्व कोकाटे हा ९४.८ टक्के गुण घेत पाचव्या स्थानी राहिला.
यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले आहे. श्रृती शरद घारोड, गायत्री कैलास उईके, अनुराग प्रधान, नचिकेत राठोड, सर्वेश पवार हे विद्यार्थी ९५ टक्केच्यावर गुण घेत यशस्वी झाले आहेत. यवतमाळ येथील सेंट अलॉयसिअसची विद्यार्थिनी साक्षी सुधीर वानखडे ही ९८ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली आहे. सीबीएसई बोर्डात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून गुणवंत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (शहर वार्ताहर)

Web Title: Brilliant performance in CBSE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.