वृद्ध कलाकारांच्या मानधनातही दलाली
By admin | Published: February 7, 2017 01:24 AM2017-02-07T01:24:20+5:302017-02-07T01:24:20+5:30
पुसद तालुका सर्वात मोठा असून, कलावंतांची संख्याही येथे जास्त आहे.
पुसद : पुसद तालुका सर्वात मोठा असून, कलावंतांची संख्याही येथे जास्त आहे. वृद्ध कलाकारांना दरमहा १५०० रुपये मानधन मिळते. हे मानधन मिळविण्यासाठी वृद्ध कलावंतांची गर्दी वाढत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी पुसद येथे दलालही वाढले आहेत. ग्रामीण भागातील भोळ््याभाबड्या वृद्ध कलावंतांना गाठून त्यांना जाळ््यात ओढून त्यांना मानधन मिळवून देतो, असे सांगून हे दलाल प्रवृत्तीचे लोक लुबाडतात.
सध्या तरी यवतमाळ जिल्हा निवड मंडळाचा पुसद येथील कुणीही अध्यक्ष नाही. निवड मंडळातही कुणीही नाही. तसेच पुसद तालुक्याचा अधिकृतरित्या व नियमाप्रमाणे कुणीही अध्यक्ष नाही. तेव्हा कुणाच्याही भूलथापांना नवीन वृद्ध कलावंतांनी बळी पडण्याचे कारण नाही. या दलालांपैकी अनेक जण तर उमरखेड, महागाव, दिग्रस भागात फिरून चंदा जमवित आहेत. नको त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते, असे सांगून फी द्यायला भाग पाडत आहे. पुसद येथे वृद्ध कलाकारांचे रजिस्टर मंडळ आहे. परंतु ते कार्यरत नसून थंडबस्त्यात आहेत. त्यामुळे आपणच मंडळाचे अध्यक्ष सांगणाऱ्यांपासून सावध राहणे कलावंतांच्या हिताचे आहे. (शहर प्रतिनिधी)