बीएसएनएलने वीजबिल थकविले अन् नेरमधील बँकांचे इंटरनेट गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:57 PM2019-01-22T12:57:56+5:302019-01-22T13:27:29+5:30

नोव्हेंबर -डिसेंबर या दोन महिन्याचे २९  हजार रूपये न भरल्याने विद्युत महावितरने १९ जानेवारीपासून कार्यालयाचा पूरवठा खंडीत केला.

BSNL exhausted electricity bill ner banks Internet | बीएसएनएलने वीजबिल थकविले अन् नेरमधील बँकांचे इंटरनेट गेले

बीएसएनएलने वीजबिल थकविले अन् नेरमधील बँकांचे इंटरनेट गेले

Next
ठळक मुद्देनेर तालूक्यातील बीएसएनएल कार्यालयाचा विद्युत पूरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ग्राहकांचे गेल्या तीन दिवसांपासून हाल होत आहे. नोव्हेंबर- डिसेंबर या दोन महिन्यांचे बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर -डिसेंबर या दोन महिन्याचे २९  हजार रूपये न भरल्याने विद्युत महावितरने १९ जानेवारीपासून कार्यालयाचा पूरवठा खंडीत केला.

नेर - नेर तालूक्यातील बीएसएनएल कार्यालयाचा विद्युत पूरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ग्राहकांचे गेल्या तीन दिवसांपासून हाल होत आहे. नोव्हेंबर- डिसेंबर या दोन महिन्यांचे बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एक नमूना बघावयास मिळाला.

नेर तालूक्यातील बँकीग व्यवस्था बीएसएनएल नेटवर्कवर अवलंबून आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून नेरच्या बीएसएनएल कार्यालयाला भंगाराचे स्वरूप आले आहे. कार्यालयात केवळ एक कर्मचारी असून नेर तालूक्याची संपूर्ण व्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे. नेरमध्ये केबल कनेक्शन भारतीय स्टेट बँक व विविध शासकीय कार्यालयाचे नेट बीएसएनएलवर अवलंबून आहे. या कार्यालयाने नोव्हेंबर -डिसेंबर या दोन महिन्याचे २९  हजार रूपये न भरल्याने विद्युत महावितरने १९ जानेवारीपासून कार्यालयाचा पूरवठा खंडीत केला. यामुळे तालूक्यातील इंटरनेट व्यवस्था कोलमडली आहे. मोबाईल बंद पडले आहे व या नेटवर कॅफे चालवणाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. 

कर्मचाऱ्यांविना कार्यालय अनाथ

नेर तालूक्यात कांरजा रोडवर बीएसएनएलची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवास बांधली. पण गेल्या कित्येक वर्षापासून येथे एक कर्मचारी कार्यरत आहे. तो कर्मचारीच कार्यालय सांभाळतो. निवारा व कार्यालयात चूकीचे कृत्य होत असल्याच्या चर्चा आहे. एवढी प्रशस्त इमारत आता कर्मचाऱ्यांविना अनाथ झाली आहे. बिले भरण्यासाठीसूद्धा दारव्हा येथे जावे लागते. दूरस्ती वेळेवर होत नाही. 

गेल्या दोन महिन्यांपासून बीएसएनएल कार्यालयाने २८९२० बिल वारंवार सूचना देऊनही भरले नाही यामुळे पूरवठा खंडीत करावा लागला.
-श्रीकांत तळेगावकर, सहाय्यक अभियंता वि म नेर

विमने विद्युत पूरवठा खंडित केल्याने तालुक्यातील इंटरनेट सेवा कोलमडली आहे याबाबत बीएसएनएलने त्वरीत पाऊल उचलावे
-संतोष परदेशीकर, संचालक पिसीएन न्यूज नेर

Web Title: BSNL exhausted electricity bill ner banks Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.