बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:30 PM2017-09-25T22:30:48+5:302017-09-25T22:31:12+5:30

पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे.

Bt cotton is also the source of larvae | बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उधारीच्या औषधीतून सुरू आहे शेतकºयांची लूट

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.
संबधित सर्वच कंपनीकडून बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा केला जातो. यासाठी मोठ-मोठ्या जाहिराती करून शेतकºयांना आकर्षित केले जाते. यावर विश्वास ठेऊन अनेक शेतकºयांनी बीटी कपाशी लावण्यास सुरुवात केली. परंतु यावर्षी बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कृषी केंद्र दुकानदारांसह अनेकांचे मार्गदर्शन घेत आहे. यातूनच अळीचा नायनाट करण्यासाठी विविध औषधांची फवारणी केली जाते. औषधी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. दुकानदारही मनमानी भावाने औषधी विकून आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. एवढेच नाही तर उधारीने औषध देऊन ते दीडपटीने वसूल केले जाते. या प्रकारामुळे फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे, असे असले तरी फवारणीला अळी दादच देत नसल्याने शेतकºयांच्या काळजीत आणखीच भर पडली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.
कंपनीवर ठोकणार दावा
बीटी कंपन्यांनी अळी येणार नाही, अशा जाहिराती केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेऊन माझ्यासह अनेकांनी कपाशीची लागवड केली असल्याचे शेतकरी आनंदराव जगताप ‘लोकमत’सोबत बोलताना म्हणाले. आता अळींनी कपाशीवर आक्रमण केले आहे. एवढेच नाही तर फवारणीलाही ही अळी मानत नाही. त्यामुळे या विषयावर अनेक शेतकरी एकत्र येत कंपनीविरोधात दावाकरणार असल्याची माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतीशिल शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.

बीटीवर अळ्यांनी आक्रमण केले, ही बाब सत्य आहे. परंतु यासाठी शेतकरीही तेवढेच जबाबदार आहे. कपाशी लागवडीच्या नियमानुसार शेतकरी बीटीची लावगड करीत नाही. रेफुजी लागवडीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अळीचा पादुर्भाव वाढला आहे.
- किशोर अंबरकर
कृषी अधिकारी,
पंचायत समिती कळंब

Web Title: Bt cotton is also the source of larvae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.