घाटंजी येथे बौद्ध धम्म परिषद
By admin | Published: May 31, 2014 11:46 PM2014-05-31T23:46:10+5:302014-05-31T23:46:10+5:30
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने तीन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. यात प्रबोधनपर कार्यक्रम, कविसंमेलन, एकपात्री नाट्यप्रयोग,
घाटंजी : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने तीन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. यात प्रबोधनपर कार्यक्रम, कविसंमेलन, एकपात्री नाट्यप्रयोग, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गौरव आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
परिषदेच्या दुसर्या दिवशीच्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीमुळे झालेला बदल या विषयावर भिक्खू संघांनी धम्मदेसना दिली. मिलिंद गुरुजी (कर्नाटक), एस.डी. डहाट (बंगलोर), गजभेजी (छत्तीसगड) आदींनी मार्गदर्शन केले. प्रा.अमित भगत, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष जीवने, सुनील वेले यांनी अनुक्रमे प्रास्ताविक, संचालन आणि आभार मानले. दुसर्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय बौद्ध महासभा स्थापनेमागील उद्देश व कार्य या विषयावर प्रा.ज्वाला देहाने प्रा.डॉ.सरिता कावळे यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष बी.के. बर्वे होते. संचालन प्रा.उत्तमराव शेंडे यांनी केले.
तिसर्या दिवशीच्या सत्रात त्रिशरण पंचशील वंदना देऊन भन्तेंच्या हस्ते धम्मदेसना देण्यात आली. यानंतर कविसंमेलन आणि ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. समारोपीय सत्राचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील होते. महासचिव व्ही.एस. मोकळे, जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, शंकरराव ढेंगळे, देवानंद शेळके, गोविंद मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील डॉ.मिलिंद जीवने, प्रकाश गायकवाड, सुखदेव रामटेके यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी जयकृष्ण बोरकर, चित्ररेखा रामटेके, करुणाताई सिरसाठ आदींची उपस्थिती होती. संतोष जीवने, गुलाब सिसले, मंगेश रामटेके यांनी प्रास्ताविक, संचालन आणि आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यानंतर ‘धम्मदीक्षा’ नाट्यप्रयोग सादर झाला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुरेश जाधव, सतीश रामटेके, डॉ.आनंदराव कांबळे, भारत लढे, देवकुमार शेंडे, जोतिबा कानिंदे, संजय पाईकराव, प्रवीण लढे, अरविंद मानकर, बंडू सोनडवले, शामकांत धोटे, संदीप भरणे, भारत मोटघरे, ओम नैनपाल, भाविक भगत, संदीप कानिंदे, गुणवंत चंदनखेडे, संजय कांबळे, प्रवीण कांबळे, मनोज मुनेश्वर, शशिकला नैनपाल, शोभाताई रामटेके, अर्चना तुरे, जिजाबाई बनसोड आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)