जिल्ह्यात १५ हजार कोटींचे रस्ते बांधणार

By Admin | Published: November 26, 2015 02:34 AM2015-11-26T02:34:19+5:302015-11-26T02:34:19+5:30

विकासात रस्त्यांना महत्त्व असून मजबूत रस्ते विकासाला गती देतात. आपल्या भागात डांबरी रस्ते उपयोगी ठरत नसल्याने आता काँक्रिटचे रस्ते तयार केले जाणार आहे.

Build 15 thousand crores roads in the district | जिल्ह्यात १५ हजार कोटींचे रस्ते बांधणार

जिल्ह्यात १५ हजार कोटींचे रस्ते बांधणार

googlenewsNext

नितीन गडकरी : तीन हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन
यवतमाळ : विकासात रस्त्यांना महत्त्व असून मजबूत रस्ते विकासाला गती देतात. आपल्या भागात डांबरी रस्ते उपयोगी ठरत नसल्याने आता काँक्रिटचे रस्ते तयार केले जाणार आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेरपर्यंत १५ हजार कोटींची सिमेंट रस्त्यांची कामे सुरू केली जातील, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्तेबांधणी कामाचे भूमिपूजन येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय उर्वरक व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी, खासदार रामदास तडस, आमदार मदन येरावार, आमदार प्रा. राजू तोडसाम, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी चंद्रशेखर उपस्थित होते.
ना. गडकरी म्हणाले, सिमेंटचे रस्ते दीर्घायुषी असतात. मेंटनन्सवर फार खर्च होत नाही. युतीच्या काळात यवतमाळात तयार केलेला सिमेंट रस्ता आजही चांगल्या स्थिती आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात १५ हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू केली जातील. यासाठी ९५ लाख टन सिमेंट बुक केले असून, त्याचा ३७ कंपन्यांसोबत दर करार करण्यात आला आहे. पोहरादेवी येथून राष्ट्रीय महामार्ग जाण्यासाठी ११० कोटींचे काम लवकरच मंजूर केले जाईल. बुटीबोरी ते तुळजापूर या ५२४ किलोमीटरच्या मार्गासाठी सात हजार २६२ कोटींची तरतूद असून, चार पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. याशिवाय खासदार विजय दर्डा यांनी सुचविलेल्या यवतमाळ-धामणगाव रस्त्यासाठी सीआरएफमधूनच निधी वाढवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामासाठी शिपिंग कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून १५ कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा गडकरी यांनी केली.
कार्यक्रमाला माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार दिवाकर पांडे, अण्णासाहेब पारवेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, रामदास आंबटकर, परसराम आडे, शहराध्यक्ष अजय राऊत आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

‘पीएमजीएसवाय’ला अर्थबळ द्या - विजय दर्डा
खासदार विजय दर्डा यांनी या कार्यक्रमात यवतमाळ-नागपूर मार्गाच्या स्थितीकडे ना. नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. नवीन राज्यमार्ग हा शहराबाहेरून जावा, यवतमाळ-धामणगाव या चौपदरी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमधून आर्थिक तरतूद करावी, जिल्ह्यातील सिंचन वाढविण्यासाठी लोअर पैनगंगा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करावे, वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाचे काम तीन वर्षात पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही खासदार दर्डा यांनी व्यक्त केली. यवतमाळातील धावपट्टीवर नाईट लॅडींगची व्यवस्था केल्यास नागपूर विमानतळाला जवळचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, ग्रामीण रस्ते निर्मितीत अमूलाग्र बदल आणलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी आर्थिक तरतूद नाही याकडेही लक्ष द्यावे, असे खासदार दर्डा यांनी सांगितले.

Web Title: Build 15 thousand crores roads in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.