तिच्या पायातील घुंगरं अबोल झाली..!

By admin | Published: March 16, 2017 01:04 AM2017-03-16T01:04:01+5:302017-03-16T01:04:01+5:30

नादावलेल्या पायात घुंगरं बांधून ती रंगमंचावर यायची, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने सारे सभागृह दणाणून जायचे.

The bulgers in her feet became abolished ..! | तिच्या पायातील घुंगरं अबोल झाली..!

तिच्या पायातील घुंगरं अबोल झाली..!

Next

रागिणीची अकाली एक्झिट : जन्मदात्यांचा आक्रोश, छकुली का जगण्यावरच रुसली?
संतोष कुंडकर वणी
नादावलेल्या पायात घुंगरं बांधून ती रंगमंचावर यायची, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने सारे सभागृह दणाणून जायचे. तिच्या जादुई नृत्याविष्काराच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत केवळ टाळ्या आणि टाळ्याच पडत. लावणी असो वा मुजरा किंवा मग कथ्थक.. साऱ्याच नृत्यप्रकारांची ती राणी होती. मादक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करण्याची जादू तिच्या डोळ्यात होती. तिच्या असण्याने स्पर्धा सुगंधी व्हायच्या... पण आता असे घडणार नाही. रंगमंचावर लिलया थिरकणारी तिची नाजूक पावलं आता कायमची स्तब्ध झाली आहेत. रसिक मनाला वेड लावणारी ही नृत्यांगना आता अनंतात विलीन झाली आहे. रागिणी गोडे नावाचं कला विश्वात घोंगावणारं एक वादळं कायमचं आणि कायमचं शांत झालं. तिच्या अकाली जाण्याने तिच्या पायातली घुंगरं आता अबोल झाली आहेत. यापुढे स्पर्धा होतील. नृत्याचे कार्यक्रम होतील. रंगमंचाला तिची प्रतिक्षाही असेल. पण ती तेथे असणार नाही. तिच्या पायातल्या घुंगरांचा नादही आता कुण्या काळजाचा ठाव घेणार नाही. कारण आता ती अनंत यात्रेला निघून गेलीय...कधीच परत न येण्यासाठी....!
कला रक्तातच असावी लागते. ती रागिणीच्या रक्त्याच्या थेंबा-थेंबात होती. अगदीच बालपणापासूनच तिला नृत्याचं वेड. सांस्कृतिक विश्वामध्ये अवघ्या महाराष्ट्रात लौैकिक असलेल्या वणी शहराच्या मातीत जन्म घेणाऱ्या रागिणीने शेकडो नृत्य स्पर्धांमध्ये मिळविलेले ढिगभर पुरस्कार पाहिले की, तिच्यातील कलावंत किती मोठी होती, याचा अंदाज येतो. अगदी कोवळ्या वयात तिने मिळविलेलं यश कौैतुकास्पदच होतं. नृत्याचा छंद जोपासताना तिने कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. दहावीत तिनं ९५ टक्के गुण मिळविले होते. नृत्याची आवड असली तरी तिला डॉक्टर व्हायचं होतं. तशी तयारीही तिनं केली. पण नियतीला हे मान्य नव्हतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल. कलेवर कायम प्रेम करणाऱ्या रागिणीचं जीवनावरही नितांत प्रेम होतं. तिच्या गोड चेहऱ्यावर कायम झळकत राहणारं हसू नेमकं तेच सांगायचं. मग ही छकुली जगण्यावरच का रुसली? का असा राग काढला तिनं स्वत:वर? सर्वांनाच मागे टाकून ही वेडी अशी का एकाकी पुढे निघून गेली? ज्या समाजसेवी जन्मदात्याने आजवर अनेकांचे प्राण वाचविले, त्या पित्यालाही हुलकावणी देऊन तिने एका बेसावध क्षणी प्राण त्यागलेत..तुडूंब प्रेम करणाऱ्या माता-पित्याच्या, भावंडांच्या माघारी तिला असा अघोरी खेळ कसा खेळता आला? शेवटी एवढच म्हणावसं वाटत...
बुझ जाते हैै कही चिराग
सिर्फ आबुदाना की कमी से
हर बार सिर्फ कसूर हवा
का नही होता...

Web Title: The bulgers in her feet became abolished ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.