पांढरकवडात अतिक्रमणावर बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:45 PM2018-04-26T23:45:31+5:302018-04-26T23:45:31+5:30

शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली आहे.

Bulldozer on encroachment | पांढरकवडात अतिक्रमणावर बुलडोजर

पांढरकवडात अतिक्रमणावर बुलडोजर

Next
ठळक मुद्देपालिकेची धडक मोहीम : पोलीस बंदोबस्तात हटविले अवैध बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे.
एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली आहे. स्टेडियम रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या रस्त्याने नेहमीच वाहतूूक सुरू असते. आखाडा परिसरात बेतवार ले-आऊट, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, मुलींचे शासकीय वसतिगृह व शाळा महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी, नागरिक जाण्यायेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब असल्यामुळे हा रस्ता अगोदरच अरूंद झाला आहे. त्यातल्या त्यातच या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी तर अवैध अतिक्रमण केले होते. काहींनी तेथे दुकानेसुद्धा थाटली होती. तसेच काही व्यावसायिकांनी तर दोन-तीन ठिकाणी टपºया टाकून आपली जागा आरक्षित केली होती. ही जागा दुसºयाला ३० ते ४० हजार रूपये महिन्याने किरायाने दिली होती. अतिक्रमण करून जागा बळकावण्याची व ती दुसºयाला भाड्याने द्यायची, हा प्रकार अतिक्रमण हटविताना उघडकीस आला. या रस्त्यावरील संपूर्ण अवैध अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे हा रस्ता आता रहदारीस मोकळा झाला आहे. त्यानंतर बसवेश्वर चौकापासून जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील व्यापार संकुलासमोर असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. बचत भवनासमोर मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणे करण्यात आली होती. या अतिक्रमणामुळे बचत भवन परिसरात असलेल्या महात्मा गांधींचा पुतळाच दिसेनासा झाला होता. अतिक्रमणामुळे हा पुतळा पूर्णपणे झाकून गेला होता. पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविल्यामुळे ही जागा पूर्णपणे मोकळी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
व्यावसायिकांकडून सहकार्याची अपेक्षा
शासनाच्या आदेशानुसार शहरातील अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू असून रस्त्यावर किंवा फुटपाथवर अतिक्रमण केलेल्यांचीच दुकाने हटविण्यात येणार आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे व रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी केले आहे.

Web Title: Bulldozer on encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.