अन् डोळ्यादेखत बैलगाडी वाहून गेली.. यवतमाळ जिल्ह्यात पुराचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 01:38 PM2021-09-08T13:38:55+5:302021-09-08T13:39:38+5:30
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात लिंगी सायखेडा या गावातील नदीच्या पुलावरून बुधवारी सकाळी बैलगाडी वाहून गेल्याची घटना नागरिकांच्या डोळ्यादेखत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात लिंगी सायखेडा या गावातील नदीच्या पुलावरून बुधवारी सकाळी बैलगाडी वाहून गेल्याची घटना नागरिकांच्या डोळ्यादेखत घडली. या अपघातातील शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले मात्र दोन्ही बैल काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आले.
(A bullock cart was swept away in the blink of an eye .. Flood in Yavatmal district)
गेल्या पाचसहा दिवसांपासून यवतमाळात पावसाचा कहर सुरू आहे. नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. खेडोपाडी असलेल्या नदीनाल्यांवरचे पूल सुरक्षित नाहीत. त्यांना कठडेही नसतात. अशाच लिंगी सायखेडा गावातून वाहणाऱ्या एका नदीच्या पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहता होता. तशा वेगवान प्रवाहात बैलगाडीवानाने गाडी नेली व पाण्याच्या लोंढ्यासोबत ती पाहता पाहता दिसेनाशी झाली. काठावरच्या नागरिकांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन शेतकऱ्याला वाचवले मात्र दोन्ही बैल वाहून गेले. ते दुपारी काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आले.