चुकीचा रक्तगट देणाऱ्या पुसदच्या लॅबला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:07 AM2019-01-14T00:07:26+5:302019-01-14T00:08:22+5:30

चुकीच्या रक्तगटाचे प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात पुसद येथील पॅथोलॉजी लॅबला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. सोबतच विमा कंपनीनेही भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे.

Bunch of missteped pulse labels | चुकीचा रक्तगट देणाऱ्या पुसदच्या लॅबला दणका

चुकीचा रक्तगट देणाऱ्या पुसदच्या लॅबला दणका

Next
ठळक मुद्दे आधी एबी पॉझिटीव्ह, नंतर ओ : जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चुकीच्या रक्तगटाचे प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात पुसद येथील पॅथोलॉजी लॅबला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. सोबतच विमा कंपनीनेही भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे.
पुसद तालुक्याच्या बोरी(खु) येथील नितीन सीताराम जाधव यांनी त्यांच्या मुलाची रक्तगट तपासणी डॉ. राजेश अग्रवाल यांच्या सत्यशांती पॅथोलॉजी लॅबमध्ये केली होती. त्यावेळी त्यांना मुलाचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असा सांगितला. तसे प्रमाणपत्रही दिले होते. पाच महिन्यानंतर मुलाची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांना मुलाला रक्ताची गरज असल्याचे सांगितले. पुसदमध्ये या गटाचे रक्त उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नागपूर येथून एबी पॉझिटिव्ह रक्त बोलाविले.
नागपूर येथून बोलाविलेले रक्त आणि मुलाचे रक्त यात फरक आढळला. तेव्हा मुलाचा रक्तगट ओ असल्याचे स्पष्ट झाले. सत्यशांती लॅबने दिलेल्या प्रमाणपत्राविरूद्ध नितीन जाधव यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. लॅब आणि न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दोनही बाजूच्या युक्तिवादाअंती सत्यशांती लॅबने सदोष सेवा दिल्याच्या निर्णयाप्रत मंच पोहोचले. लॅब आणि अ‍ॅशुरन्स कंपनीने जाधव यांना आर्थिक नुकसान, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ६० हजार रुपये व तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे.

रक्तगटात फरकाची शक्यता
सदर प्रकरणात सत्यशांती लॅबने आपली बाजू मांडताना पेशंटच्या रक्तातील कोल्ड अ‍ॅटो अँटीबॉडीजमुळे रक्तगटात फरक येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. नवजात बाळाचे ए, बी, ओ अँटीजन्स हे पूर्णत: डेव्हलप झालेले नसतात. नवजात बाळाची प्रतिकारशक्ती वाढत्या वयानुसार वाढत जाते. काही प्रकरणात रक्तगट बदलू शकतो, अशी बाजू मांडण्यात आली.

Web Title: Bunch of missteped pulse labels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.