झाडाला बांधून जावयाचा खून

By admin | Published: March 11, 2017 10:07 PM2017-03-11T22:07:38+5:302017-03-11T22:08:26+5:30

लिंब येथील घटना : पत्नीला आणण्यासाठी गेल्यानंतर कृत्य; सासू, सासरा अन् मेहुण्यावर गुन्हा

Bundle | झाडाला बांधून जावयाचा खून

झाडाला बांधून जावयाचा खून

Next

 सातारा आवृत्तीस वापरली आहे, इतर आवृत्तींसाठी... सातारा : पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या जावयाचा झाडाला बांधून मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना लिंब, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सासू, सासरा आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे. महादेव बापू पवार (वय २८, रा. मतकर कॉलनी, सातारा) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महादेव पवार याची पत्नी काही महिन्यांपासून त्याच्यासोबत राहात नव्हती. त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी तो लिंब येथे गेला होता. ‘पत्नीला माझ्यासोबत पाठवा,’ असे त्याने सासऱ्याला सांगितले. मात्र, त्यांनी आपल्या मुलीला पाठविण्यास नकार दिला. याचा राग त्याला आल्याने त्याने सासरे हरी राठोड यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. त्यामुळे संतप्त होऊन मेहुणा सुनील आणि सासू शारदा तसेच सासरा शंकर यांनी जावई महादेवला बेदम मारहाण केली. त्यानंतर लिंब येथील खडवी नावाच्या शिवारातील एका झाडाला त्याला बांधण्यात आले. त्याला तेथेच सोडून सर्वजण घरी आले. हरी राठोड यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने ते जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले. उपचार घेतल्यानंतर ते परत घटनास्थळी गेले. त्यावेळी जावयाचे मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. त्यानंतर महादेवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. महादेव पवार यांचा भाऊ शंकर पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सासू, सासरा आणि मेहुण्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मेहुणा सुनील याला अटक केली आहे. (प्रतिनिधी) चौकट : राठोड कुटुंबीय विहिरीचे खोदकाम मजूर म्हणून काम करतात. या घटनेपूर्वी राठोड कुटुंबीय लिंब येथे एका विहिरीचे खोदकाम करत होते. त्याच ठिकाणी हा प्रकार घडला असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

Web Title: Bundle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.