वडगाव, वाघापूरमध्ये घरफोडीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 05:00 AM2022-06-20T05:00:00+5:302022-06-20T05:00:14+5:30

वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील अरुण सरागे हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ४० हजार काढले. तोडफोडीचा आवाज आल्याने शेजारी असलेले कुटुंब जागे झाले. चोर असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी आरडाओरडा करीत इतरांना मदतीला बोलाविले. याच दरम्यान, चोरटे चाकूचा धाक दाखवून तेथून पळून गेले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका घरात चोरीचा प्रयत्न केला.

Burglary session in Wadgaon, Wagahpur | वडगाव, वाघापूरमध्ये घरफोडीचे सत्र

वडगाव, वाघापूरमध्ये घरफोडीचे सत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात सातत्याने घरफोडीचे सत्र सुरू  आहे. चोरटा काही केल्यास पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी वडगाव व वाघापूर या दोन परिसरांत धुमाकूळ घातला. वाघापूर येथील सावित्रीबाई फुले सोसायटीमध्ये चोरट्यांनी नागरिकांना चाकूचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. या दोन्ही ठिकाणांवरून चोरट्यांनी जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. 
वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील अरुण सरागे हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ४० हजार काढले. तोडफोडीचा आवाज आल्याने शेजारी असलेले कुटुंब जागे झाले. चोर असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी आरडाओरडा करीत इतरांना मदतीला बोलाविले. याच दरम्यान, चोरटे चाकूचा धाक दाखवून तेथून पळून गेले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथे कुटुंबीय सजग असल्याने चोरट्यांना डाव साधता आला नाही. ते पसार झाले. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
लोहारा पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. चोरट्यांनी वापरलेल्या अवजारांवरील ठसे घेण्यात आले. श्वानानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर काही अंतरावर हे श्वान घुटमळले. पुढे आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी चोरीचा दाखल केला आहे. 

सत्यनारायण ले-आउटमध्ये ऑटो चालकाचे घर फोडले
- वडगाव परिसरातील आर्णी मार्गावरील सत्यनारायण ले-आउटमध्ये ऑटो चालकाचे घर फोडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून एक लाख ६० हजारांची रोख व पाच हजारांची चांदी असा मुद्देमाल लंपास केला. नितीन यशवंत कांबळे हे कुटुंबीयांसह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी सायंकाळी घरी परत आले असता, त्यांना घरफोडी झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांची रात्रगस्त ठरतेय फार्स
- शहरात लोहारा, यवतमाळ शहर, अवधूतवाडी हे प्रमुख पोलीस ठाणे आहेत. याशिवाय पोलीस मुख्यालय व इतर पथकातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शहरात वावर असतो. त्यानंतरही चोरट्यांवर वचक बसलेला नाही. राजरोसपणे घरफोड्या व चोरीचे गुन्हे घडत आहेत. पोलीस ठाणे स्तरावर दररोज रात्रगस्तीचे नियोजन केलेले असते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांची गस्त होतच नसल्याचे चोरीच्या घटनांवरून दिसून येते. पूर्वी रात्रगस्तीसाठी बारकोड प्रणाली आणली होती. 

 

Web Title: Burglary session in Wadgaon, Wagahpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.