नाफेडकडून तुरीची थेट खरेदी
By admin | Published: January 2, 2016 08:36 AM2016-01-02T08:36:30+5:302016-01-02T08:36:30+5:30
तुरीला चांगले दर मिळावे, दलालांची अरेरावी थांबावी आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीला लगाम बसावा म्हणून केंद्र शासनाने
रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
तुरीला चांगले दर मिळावे, दलालांची अरेरावी थांबावी आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीला लगाम बसावा म्हणून केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नववर्षारंभापासून नाफेडने तुरीची थेट खरेदी सुरू केली आहे. यासाठी यवतमाळसह विदर्भ आणि मराठवाड्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. या केंद्रावर तुरीला ९५०० रूपये क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला.
सध्या खुल्या बाजारात तुरीची खरेदी करताना ७००० रूपये क्विंटलपासून होत आहे. खुल्या बाजारात अधिकतम दर ९००० रूपयांपर्यंत पोहोचले आहेत. नाफेडने उच्चतम दराने खरेदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे किमान दर त्या ठिकाणी नाही. यामध्ये सध्या २५०० रूपयांचा फरक आहे. गतवर्षी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची साठेबाजी केली. त्यामुळे तूरडाळीचे दर वधारले. यावर्षी तुरीचे उत्पादन घटले. पुढील काळात तुरीची साठेबाजी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हा प्रकार हाणून पाडण्यासाठी राज्याने तुरीची आयात केली. मात्र उत्पादन कमी असल्याने पुरेशी तूरडाळ मिळाली नाही. महागाई नियंत्रित करण्यासोबत शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळावे म्हणून नाफेडने पाऊल उचलले आहे. चांगल्या प्रतिचा माल नाफेड खरेदी करणार आहे. या प्रक्रियेत दलाल राहणार नाही. यामुळे शेतमालाचे संपूर्ण दर शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. सध्या नाफेडने ९५०० रूपये क्विंटले तुरीची थेट खरेदी केली आहे. यामध्ये दररोज जो भाव केंद्र जाहीर करेल, त्यानुसार खरेदी होणार आहे. दलाली न घेता ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांकडे वळती होणार आहे. खुल्या बाजारात जे दर सुरू आहेत, त्यानुसारच तुरीची खरेदी होणार आहे.
व्यापाऱ्यांच्या विरोधाने गोंधळाची स्थिती
४प्रारंभी खुल्या बाजारातून तूर खरेदी करण्याचे धोरण नाफेडने ठरवले. त्यानुसार नाफेडच्या प्रतिनिधीने बैठक घेतली. थेट खरेदीचा मुद्दा मांडला. मात्र याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यामुळे पहिल्या दिवशी तूर खरेदी करताना गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नाफेडच्या तूर खरेदीसाठी स्वतंत्र गाळा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना नाफेडला तूर द्यायची, त्यांनी या ठिकाणी तूर दाखवायची. ती खरेदी होणार आहे.
असे आहेत निकष
४तूर खरेदी करताना त्यात ओलावा नसावा असा प्राथमिक निकष आहे. साधारणत: १२ टक्केपर्यंत ओलावा असणारी तूर हे केंद्र खरेदी करणार आहे. अधिक काडी कचरा नसावा. खरेदी झालेल्या तुरीचे पैसे ३ ते ४ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
४केंद्र शासनाने नाफेडच्या तूर खरेदीत यवतमाळ, अकोला, अमरावती, खामगाव, मलकापूर आणि हिंगणघाटचा समावेश केला आहे. या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.