सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:09+5:30

पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले.

CAA law against secularism | सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध

सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देअब्दूर रहेमान : पुसद, दिग्रस येथे मार्गदर्शन, विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/दिग्रस : सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. मात्र एनआरसी मुसलमानांच्या विरोधात नसून ८० टक्के जनतेच्या विरोधात आहे. गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी, ओबीसी आदी समाजाला त्याचा फटका बसणार आहे, असे मत आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी पुसद व दिग्रस येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंचावर डॉ.मोहमद नदीम, मोहमद सनी, मसूद मिर्झा, इस्तियाकभाई, डॉ.अकील मेमन, सुधीर देशमुख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिग्रस येथे टाऊन हॉल परिसरातील आंदोलनाला भेट दिल्यानंतर अब्दूर रहेमान यांनी केंद्रातील सरकार आपल्या अपयशाचे पाप लपविण्यासाठी देशातील जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला. ही देशाच्या ऐक्य, अखंडता, प्रगती व भविष्यासाठी अत्यंत धोक्याची आणि चिंतेची बाब असल्याचे सांगितले.
शाहीन बाग आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध भाजप नेते खालच्या पातळीवरची भाषा वापरून महिलांचा अपमान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, डॉ.मोहमद नदीम, राजेंद्रसिंह चौहान, शंकर जाधव, लालसिंग राठोड, आसीम अली, गौतम तुपसुंदरे, पंजाब जाधव, मिर्झा अफजल बेग, हाजी शौकत मलनस, आसिफ गोंडील, फिरोज खान, इकरार शेख यांच्यासह विविध धर्मीय बांधव उपस्थित होते. संचालन एजाजोद्दीन यांनी केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

विचारधारेला विरोध
मनुवादी आणि आरएसएसच्या विचारधारेला आपला विरोध असून या कायद्यांमुळे हिंदू व मुस्लिमांमध्ये वाद उभारून भाजपाला सत्ता भोगायची असल्याचे मत अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले. देशात शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ‘संविधान बचाओ-देश बचाओ’ ही आमची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: CAA law against secularism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.