शिबिराने दिला दोस्तीचा ‘हात’

By Admin | Published: November 23, 2015 02:11 AM2015-11-23T02:11:33+5:302015-11-23T02:11:33+5:30

गणपत आणि मधुकर. कृत्रिम अवयव बसवून घेण्यासाठी ते दोघेही आजूबाजूला बसले होते. गणपतला हात बसवून घेण्यासाठी शर्ट काढायचा होता, पण जमत नव्हते.

Camp gave 'friendship' to friendship | शिबिराने दिला दोस्तीचा ‘हात’

शिबिराने दिला दोस्तीचा ‘हात’

googlenewsNext

शिबिराचे फलित : माजी सरपंच आणि निवृत्त मुख्याध्यापकाची अनोखी भेट
यवतमाळ : गणपत आणि मधुकर. कृत्रिम अवयव बसवून घेण्यासाठी ते दोघेही आजूबाजूला बसले होते. गणपतला हात बसवून घेण्यासाठी शर्ट काढायचा होता, पण जमत नव्हते. शेवटी बाजूलाच बसलेल्या मधुकरने स्वत:चे दोन्ही हात वापरून गणपतचा शर्ट काढून दिला. पण शर्ट काढता-काढता दोघांनीही एकमेकांचे चेहरे न्याहाळले अन् चकीत झाले. काही वर्षांपूर्वी घट्ट मैत्री असलेले ते दोघे बऱ्याच कालावधीनंतर आज अचानक जवळ आले होते. अपंगत्वाच्या जखमा बाजूला ठेवून हास्यकल्लोळात बुडूनही गेले.
वयाची साठी ओलांडलेल्या दोघांच्याही मनात आठवणींचा फ्लॅशबॅक सुरू झाला. गणपतराव भोंगाडे हे १९८८ मध्ये वटबोरी गावाचे सरपंच होते. अन् त्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळेत मधुकर गहूकार मुख्याध्यापक होते. दोघांचाही स्वभाव विनोदी. साहजिकच गट्टी जमली होती. पण काळ पुढे सरकला. गणपतरावचे सरपंचपदही गेले आणि मधुकररावही यवतमाळला राहायला गेले. गाठीभेटी संपल्या. काही काळाने एकमेकांचे एकमेकांना विस्मरणही झाले.
पण काळाने पुन्हा त्यांना आज एकमेकांच्या आजूबाजूला आणून बसविले. एकमेकांची मदत करताना ‘‘अरे मायापेक्षा म्हतारा झाला राज्या तू!’’ असे मिश्किल वाक्य उमटले. दोघेही खळखळून हसले. तेव्हा पुन्हा एक विनोदी उद्गार उमटला, ‘‘आगा अर्धे दातं तं गायब बी झाले!’’ पुन्हा खसखस पिकली. जुनी ओळख ताजी झाली होती. सुख-दु:खाचे वाटप सुरू झाले. मधुकर गहूकार म्हणाले, २००२ मध्ये रस्ता ओलांडत असताना काळीपिवळीने उडविले. एक पाय कटला. आता कृत्रिम पाय भेटला. तेवढंच सुख. गणपतरावची कहाणी मात्र फारच वेगळी. ते म्हणाले, बिमारीमध्ये हात कापावा लागला. पण मेहनत आजही चालूच आहे. दुध डेअरीवर दूध पोहोचवावे लागते. एक हात नसला तरी ८० लिटर दुधाच्या कॅटल्या बांधून सायकल चालवतो. आता दुसरा हातही भेटला तं काही पाहायचं कामच नाही!
या दोन जुन्या मित्रांना शिबिरात हात-पाय मिळाले. जुन्या आठवणीही मिळाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उतरत्या वयात तारुण्यातला उत्साह मिळाला.

Web Title: Camp gave 'friendship' to friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.