घाटंजी व बाभूळगावात कॅन्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:30 PM2018-04-22T22:30:29+5:302018-04-22T22:30:29+5:30
कठुआ, उन्नाव येथील अत्याचार पीडितांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी शहरात भारिप-बहुजन महासंघातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. जम्मू-काश्मिरमध्ये कठुआ जिल्ह्यातील रसना येथे आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : कठुआ, उन्नाव येथील अत्याचार पीडितांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी शहरात भारिप-बहुजन महासंघातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला.
जम्मू-काश्मिरमध्ये कठुआ जिल्ह्यातील रसना येथे आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सत्ताधारी पक्षाचे आमदार व त्याच्या भावासह ईतर साथीदारांनी सामूहिक अत्याचार केला. वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीची अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनांच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथून मार्चला सुरूवात झाली. तहसीलदारांना निवेदन देऊन मार्चची सांगता झाली. तेथे डॉ.सूरज ढाले, सतीश रामटेके, डॉ.पूनम ढाले, शामराव मुनेश्वर यांनी विचार मांडले. भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे व पदाधिकाºयांच्या नेतृत्वात हा मार्च निघाला. मार्चमध्ये निखील टिपले, शंकर येलादे, अजय खोब्रागडे, जयंत वाघमारे, शांतीदूत मुळे, नगराळे, एन.जी. भगत, गुलाब सिसले, अशोक खरतडे, अशोक करमनकर, देवकुमार शेंडे, अशोक निमसरकार, एस.डी. कांबळे, किशोर मुनेश्वर, बी.टी. वाढवे, दादाराव नगराळे, शेलुकर, सुधीर कारीकांत, नरेश तुर्किले, सागर भरणे, दीक्षांत वासनिक, वीरेंद्र पिलावन, गोलू कांबळे, सुमित मून, करण भरणे, बंटी सोनडवले, राजपाल नगराळे, चंद्रकांत कांबळे, उमेश कुडमते, प्रशांत देठे, बंडू रामटेके, नीळकंट खोब्रागडे, सचिन सारवे, प्रमोद भजगवरे, महेंद्र वानखडे, सुभाष मुनेश्वर, सिद्धार्थ मुनेश्वर, विजय सिसले, आहेतेशाम पठाण, दानिश शेख, झीशान खान, अजहर पठाण, झमीर शेख, शाहरुख खान, आदिल पठाण, अक्रम चौहान, शोहब खान, रशीद पठाण, इक्बाल शेख, इम्रान खान, नाझीर सय्यद, जावेद सय्यद, लाकत तव्वर, सकिम कुरेशी, पद्माताई खोब्रागडे, करूणा नरांजे, लक्ष्मीबाई सोनटक्के, महिमा खोब्रागडे, हर्षदा शेंडे, वर्षा बागेश्वर, प्रिती बागेश्वर, शशिकला नैनपार, अर्चना तुरे, चंदाताई लढे, प्रज्ञाताई रामटेके, इंद्रकलाबाई भरणे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.
बाभूळगावात सर्वधर्मीयांचा सहभाग
कठुआ, उन्नाव येथील घटनेचा निषेध करून बाभूळगावात शुक्रवारी सायंकाळी शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. सर्वधर्मीय नागरिक येथील स्टेट बँकेसमोर गोळा झाले. तेथून विविध घोषणा देत मार्च सुरू झाला. इंदिरा चौकात मार्चचे सभेत रूपांत झाले. सभेला अनेकांनी मार्गदर्शन केले. या मार्चमध्ये माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, माजी आमदार अॅड.विजयाताई धोटे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, भैयासाहेब देशमुख, प्रकाशचंद छाजेड, डॉ.रमेश महानूर, श्रीकांत कापसे, अतुल राऊत, भारत इंगोले, शेख कादर, गजानन नाईकवाड, नरेंद्र कोंबे, महेंद्र घुरडे, बल्लू जगताप, नईम खान, चंदू परचाके, विलास चांदेकर, यमूताई रूमाले, धीरज रूमाले, सतीश वानखडे, अमोल कापसे यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.