दोन महिन्यांपासून कालव्याचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:21 PM2018-01-20T23:21:13+5:302018-01-20T23:21:25+5:30
तालुक्यातील नरसाळा लघू प्रकल्पाअंतर्गत येणाºया कालव्याच्या दुरूस्तीसाठी साहित्य येऊनही गेल्या दोन महिन्यापासून कालवा दुरूस्तीचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले असून त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्यातील नरसाळा लघू प्रकल्पाअंतर्गत येणाºया कालव्याच्या दुरूस्तीसाठी साहित्य येऊनही गेल्या दोन महिन्यापासून कालवा दुरूस्तीचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले असून त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.
राज्य शासनाने विदर्भातील सिंचनात वाढ करण्याच्या हेतूने कालवा दुरूस्तीचे काम हातामध्ये घेतले आहे. नरसाळा लघू प्रकल्पांतर्गत येणाºया नरसाळा, बोरी खु., पिसगाव, धामणी आदी गावातील शेतामधून गेलेला कालवा देखभालीअभावी नादुरूस्त आहे. त्यामुळे धरणात पाणी असूनही शेतकºयांना सिंचनासाठी पाणी गेल्या काही वर्षापासून मिळत नाही.
दिवाळीपूर्वी या कालव्याच्या दुरूस्तीसाठी दोन ट्रक सिमेंट बॅग आल्या. परंतु गेल्या दोन महिन्यापासून सिमेंट असेच पडून आहे. मात्र प्रत्यक्षात या कालव्याच्या कामाला अद्यापही सुरूवात झाली नाही. सिमेंट पडून असल्याने हे सिमेंट जाग्यावरच खराब होणार की कालव्याचे काम प्रशासन सुरू करणार, हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.