खासदार, आमदारांचे पेन्शन रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:53 PM2018-08-07T23:53:04+5:302018-08-07T23:53:42+5:30

Cancel the pension of MPs, MLAs | खासदार, आमदारांचे पेन्शन रद्द करा

खासदार, आमदारांचे पेन्शन रद्द करा

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा संप : वेतन आयोग, महागाई भत्ता, जुनी पेन्शन गाजली




लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ठेवली. यामुळे खासदार, आमदारांचेच पेन्शन रद्द करा, अशी मागणी घेऊन मंगळवारी मोर्चेकºयांनी रोष व्यक्त केला. जुन्या पेन्शनसह, सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता अशा मुद्द्यांवर सरकारचे मन वळविण्यासाठी कर्मचाºयांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी यवतमाळात संपकºयांच्या मोर्चाने लक्ष वेधले.
मोर्चानंतर तिरंगा चौकात सभा झाली. संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. संपात ४१ संघटनांचे २२ हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. राज्य शासनाने आॅक्टोबरपर्यंत प्रश्न न सोडविल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य समन्वय समितीचे निमंत्रक रवींद्र देशमुख यांनी सभेत दिला.
आंदोलनाचे नेतृत्व राज्य समन्वय समितीचे निमंत्रक रवींद्र देशमुख यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणीस नंदू बुटे, नवीन पटेल, ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, नरेशचंद्र काठोळे, दिगांबर जगताप, आशीष जयसिंगपुरे, किशोर पोहणकर, श्रीरंग रेकलवार, सुरेश मदनकर, अजय मिश्रा, सु.म. गिरीे, राजू मानकर उपस्थित होते.

नर्सेस, स्वीपर संपावर ‘मेडिकल’मध्ये रुग्णांचे हाल
यवतमाळ : संपाचा परिणाम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिसून आला. नर्सेस आणि स्वीपर कामावर नसल्याने येथील रुग्णसेवेचा डोल्हाराच कोलमडला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांची मदत घेऊन रुग्णांवर औषधोपचार सुरू केला. मात्र पर्यायी व्यवस्था तुटपुंजी ठरत असल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागला. वैद्यकीय महाविद्यालयात दिवसाला दीड ते दोन हजार रुग्ण येतात. यातील ३० टक्के रुग्ण दाखल होतात. संपूर्ण विभाग आणि वॉर्डात सुश्रुशा करण्याची जबाबदारी असलेल्या नर्सेसच संपावर असल्याने मोठा पेच निर्माण झाला. शिवाय रुग्णांना स्ट्रेचरवरून ने-आण करणारे इतर सुविधा देणारे, वॉर्डातील स्वच्छतेसाठी झटणारे कक्ष सेवक आणि सफाई कामगार संपावर असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने दक्षता म्हणून सर्व वॉर्डातील सफाई कामे सोमवारीच करून घेतली. मात्र हा संप आणखी दोन दिवस चालणार असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ओपीडीमध्ये औषधी वितरण कक्षात कर्मचारीच नसल्याने रुग्णांची रांगच रांग लागली होती. स्वत: अधिष्ठातांनी येथे अतिरिक्त डॉक्टरांना बसवून औषधी वितरण करून घेतले. पर्यायी व्यवस्था म्हणून यवतमाळातील खासगी नर्सिंग महाविद्यालयातील ८० विद्यार्थी वॉर्डात नियुक्त केले. त्यांच्यासोबत महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर, आंतरवासिता करणारे डॉक्टर, निवासी डॉक्टर यांना कामाला लावले आहे.

अर्धे शिक्षक शाळेतच
संपात बहुतांश शिक्षक संघटनांनी सहभागी असल्याचे जाहीर केले. मात्र मंगळवारी ४० टक्के शिक्षक शाळेतच होते. कास्ट्राईब आणि प्राथमिक शिक्षक संघाने संपातून फारकत घेतली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या आठ हजार शिक्षकांपैकी केवळ ८८१ जणच सहभागी झाल्याचा दावा शिक्षणाधिकाºयांनी केला. दरम्यान, जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचाºयांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. यात विजयसिंग सूर्यवंशी, अरुण खरमोटे, बलराज मगर, विवेक लिंगराज, शरद भिडे, बाबूराव पुजरवाड, सुदाम पांगुळ, दीपक जोशी, संतोष नेवारे, अशोक जयसिंपुरे, एम.पाटील, दिलीप फुटाणे, बी.एफ. बैनाडे, प्रमिला कुंभारे उपस्थित होते.

Web Title: Cancel the pension of MPs, MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.