निमंत्रण रद्दने वाङ्मयीन विचारांना काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:21 PM2019-01-07T22:21:44+5:302019-01-07T22:22:11+5:30

अर्ध्या शतकानंतर यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले. या संमेलनाच्या उद्घाटकांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करून वाङ्मयीन चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.

Cancellation of invitations can lead to literary thoughts | निमंत्रण रद्दने वाङ्मयीन विचारांना काळीमा

निमंत्रण रद्दने वाङ्मयीन विचारांना काळीमा

Next
ठळक मुद्देमाजी शिक्षणमंत्री वसंत पुरके : साहित्य संमेलन आयोजकांची भूमिका सांगकाम्याची

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अर्ध्या शतकानंतर यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले. या संमेलनाच्या उद्घाटकांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करून वाङ्मयीन चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
साहित्य संमेलनाचा आयोजक हा सांगकाम्याच्या भूमिकेत असतो. ऐनवेळी उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करून या संमेलनाला निमंत्रित असलेल्या सर्वच मान्यवर साहित्यिकांचा अपमान झाला आहे. जागतिकस्तरावर साहित्य जाती, धर्म, काळ, स्थळाच्या अतित असते. ते कुणाच्या दडपणाखाली येत नाही. मानवी मूल्यांचे संवर्धन करणे आणि मानव जातीत रुजवणे हेच महत्त्वाचे कार्य आहे. साहित्यिक ही जगाची ‘थिंक टँक’ आहे. समाजाच्या दोष, व्यथा निर्मूलनाचे काम तो करतो. केवळ विचार सोईस्कर नाही, म्हणून उद्घाटकाला नाकारणे ही अतिशय मोठी शोकांतिका आहे, असेही वसंत पुरके यांनी सांगितले. सहभागी होणाऱ्यांसाठीसुद्धा ही घटना लांच्छनास्पद आहे. संमेलनात सहभागी होण्याबाबत मी स्वत:सुद्धा विचारात असल्याचे पुरके यांनी सांगितले. मात्र यासाठी चूप बसणेही चांगले नाही. उधळून टाकण्याची भाषा करणाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते. लोकशाहीत विचार स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. मात्र येथे विचारांचा खून केला जात आहे, असाही आरोप पुरके यांनी केला.
तावडेंनी विद्यार्थ्यांचे ऐकावेच
अमरावती येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मोफत शिक्षणाची मागणी करणाºया विद्यार्थ्याला तावडेंनी थेट कारागृहात डांबण्याचे आदेश दिले. मुळात मंत्री म्हणून सर्वांच्या मागण्यांचा व सूचनांचा आदर करणे अपेक्षित आहे. तावडेंना त्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन समजूत काढता आली असती. मात्र तावडेंचा तोल गेल्याची टीका माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केली.
ख्यातनाम लेखिकेच्या गळचेपीचा निषेध-अराठे
निमंत्रण रद्द केल्याच्या प्रकाराचा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माधुरी अराठे यांनीही जाहीर निषेध केला. जागतिक दर्जाच्या ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारच्या दडपशाहीविरोधात आसूड ओढतील, या भीतीतून त्यांची गळचेपी राज्यकर्त्यांनी केली. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून महिलांना संधी मिळाली. त्यातही साहित्य महामंडळाने थेट महिला उद्घाटकाचा अपमान केला. साहित्य महामंडळ सरकारच्या दडपणात काम करत आहे. संविधानिक अधिकारावर बंदी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे अराठे यांनी सांगितले.
पत्रपरिषदेत ‘लोकमत’ची मंथन पुरवणी
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे विचार सत्ताधाºयांना रूचणारे नसल्याचे सांगत ‘लोकमत’ची ‘मंथन’ पुरवणी दाखवून वसंत पुरके यांनी आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला. हे लग्न राज्यकर्त्यांनीच मोडले. विचारांची गळचेपी, खून करणे ही निषधार्ह बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Cancellation of invitations can lead to literary thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.